खरच असे घडेल का?
खरच असे घडेल का?
स्वप्न सत्यात उतरेल का?
एकवचनी एकबाणी
राम जनी दिसेल काय?
भरकटलेल्या आम्हाला
सत्य मार्ग दिसेल का?
रामराज्य पुन्हा एकदा
याच डोळी दिसेल का?
खरच असे घडेल का?
खरच असे घडेल का?
स्वप्न सत्यांत उतरेल का?
सावळा तो कृष्ण माझा
अंगी किंचित भिनेल काय?
कलियुगातील दैत्यांचा
संहार कधी होईल का?
दहशतीसे सावट जाऊन
शीतल वारे वाहतील का?
कलियुगात पुन्हा एकदा
देवयुग नांदेल काय?
खरच असे घडेल का?
याच डोळी याच देही
देवयुग दिसेल का?
अनंत खोत, मुंबई






Be First to Comment