Press "Enter" to skip to content

श्री.नंदकुमार मरवडे यांची देश स्वातंत्र्यावर आधारित कविता

सिटीबेल लाइव्ह / काव्यकट्टा

स्वातंत्र्याच्या नभात उधळू चांदणे आनंदाचे

स्वातंत्र्याच्या नभात
उधळू चांदणे आनंदाचे
सदैव स्मरण ठेऊ या
देशभक्त, क्रांतीकारक अन् अमर हुतात्म्यांचे ||१||

पारतंत्र्याच्या श्रुंखला तोडून
स्वतंत्र झाली भारतमाता
गुलामगिरीतूनी मुक्त होऊनी
स्थापन केली लोकसत्ता ||२||

हजारो संकटा़चा सामना करीत
देश चालला आता पुढे
सर्वच क्षेत्रात उत्तुंग भरारी
वाटचाल आता महासत्तेकडे ||३||

देश माझा,मी देशाचा
भावना उरी बाळगू या
देश गौरवासाठी
सारे एक होऊ या ||४||

*श्री.नंदकुमार मरवडे,* *श्री.क्षेत्र तळवली तर्फे अष्टमी,* *ता.रोहा-जि.रायगड.*

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.