आता डाॅक्टरांच्या चिठ्ठी शिवाय खासगी लॅबमध्ये आपण करू शकतो कोरोना टेस्ट ###
पनवेल महानगरपालिका आयुक्तांचा नवा आदेश ###
सिटी बेल लाइव्ह / पनवेल #
पनवेलकरांसाठी एक महत्वाची बातमी आली आहे. पनवेल मधील नागरिकांना आता स्वतःची कोरोना टेस्ट करून घ्यायची असेल तर कोणत्याही डॉक्टर कडे जाण्याची गरज नाही. ते स्वतः कोणत्याही मान्यताप्राप्त रक्ततपासणी लॅबमध्ये जाऊन टेस्ट करून घेऊ शकतात.
याबाबत महानगरपालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी आत्ता काढलेल्या आदेशानुसार, पनवेल महानगरपालिका हद्दीमध्ये कोरोना सदृश लक्षणे असलेले रुग्ण दुर्लक्षित होऊ नये व त्यांना मुदतीत उपचार उपलब्ध व्हावे यासाठी त्यांच्या चाचण्या वेळेत होणे आवश्यक आहे. या बाबीचा विचार करून कोरोना साठी REPCR चाचणी करण्यासाठी नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिक (Registered Medical Practitioner) यांचे Prescription ची यापुढे आवश्यकता राहणार नाही. यापुढे पनवेल महानगरपालिका हद्दीतील कोणतीही व्यक्ती कोणत्याही Prescription शिवाय आय.सी.एम.आर. कडे नोंदणीकृत व मान्यताप्राप्त असलेल्या प्रयोगशाळेकडे चाचणी करू शकतील.
Be First to Comment