सिटी बेल लाइव्ह / काव्य कट्टा #
शहिद
भारतभूच्या रक्षणासाठी, हसतमुखाने देतो प्राण
नमन करूया त्या मातेला,पुत्र असा जो वीर महान
ऊन असो वा वादळ वारा,थंडी असो वा पाऊस धारा
ठाण देऊनी सीमेवरती,पहारा देतो महिने बारा
उरी झेलतो जरी हा गोळी,झुकू न देतो आपली मान…
भारतभूच्या रक्षणासाठी, हसतमुखाने देतो प्राण
नमन करूया त्या मातेला,पुत्र असा जो वीर महान
आसवे सुकती डोळ्यांमध्यी,आईची नजर रस्ता शोधी
पत्नीचेही तेच हाल,कोसळती दुःखाचे आभाळ
बहिणीची राखी वाट पाही,बाप आसवे गिळून राही…
भारतभूच्या रक्षणासाठी, हसतमुखाने देतो प्राण
नमन करूया त्या मातेला,पुत्र असा जो वीर महान
धन्य असे हे वीर जाहले,धरती साठी शहीद झाले
मातीचे हे ऋण फेडून,देशासाठी अमर झाले
चला करू त्यांना सलाम,करून या आपले राष्ट्र महान
भारतभूच्या रक्षणासाठी, हसतमुखाने देतो प्राण
नमन करूया त्या मातेला,पुत्र असा जो वीर महान
जय हिंद जय जवान
अजय शिवकर
केळवणे पनवेल
७९७७९५०४६४

Be First to Comment