स्वातंत्र्यदिन
पंधरा आॕगष्ट हा दिवस होता
एकोणीसशे सत्तेचालीस साल होता
गुलामगीरीच्या श्रूंखला तोडण्यास
अखंड भारत साथ होता…
हसत लटकले कुणी फासावर
गोळी झेले कुणी छातीवर
भोगे कुणी कारावास
कुणा पडे लाठी हमखास
गांधी नेहरू भगत टिळक
सावरकर आझाद लोकनायक
सरदार देशबंधु आणि सहाय्यक
राहिल यांची कायम ओळख
किती जण प्राणाला मूकले
किती जणांनी घरदार फुंकले
बलिदानाला तव इंग्रज झुकले
मग आम्हाला हे स्वातंत्र्य दिसले
त्यागाचा हा केशरी रंग,पांढरा असे शांतीचा
समृद्धीचा हिरवा असे,प्रगतीचे चक्र दिसे.
येता हाती तिरंगा आमच्या,
उरात मग अभिमान दिसे…
जय हिंद
अजय शिवकर
केळवणे पनवेल
७९७७९५०४६४






Be First to Comment