बावरे मन
प्रत्येक शब्द जोडताना
आठवणी तुझ्या मोजताना
चेहऱ्यावर हसू उमटून जाते….
तुझे किस्से सांगताना
साद तुला घालताना
चाहूल तुझी होऊन जाते….
तुझ्यासवे बोलताना
गुज तुझे ऐकताना
स्वतःला मी हरवून जाते…
ध्यास तुझा धरताना
वाट तुझी बघताना
रात्रही निघून जाते…
कुणा संगे बोलताना
नाव माझे विचारताना
तुझे नाव ओठी येऊन जाते
विनीता विजय म्हात्रे, पाले उरण






Be First to Comment