सिटी बेल लाइव्ह / रसायनी–राकेश खराडे #
कोरोनाच्या संकटात देशासाठी वीस लाख करोडच्या पॅकेजची घोषणा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. परंतु पॅकेज उपलब्धच न झाल्याने महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने वीस लाख कोटीच्या पॅकेजचा हिशोब मागण्याकरिता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सत्यजीत दादा तांबे यांनी सोशल डिस्टंसिंगचे पालन करीत बीजेपी कार्यालयाच्या बाहेर आंदोलन करणार होते. माञ आंदोलन करण्याआधीच अध्यक्ष सत्यजित तांबे व त्यांच्यासोबत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव प्रशांत गायकवाड, महाराष्ट्राचे उपाध्यक्ष ब्रीफ दत्त यांच्यासह पंधरा कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली.
यावेळी सत्यजित तांबे, ब्रिफ दत्त,रसायनी रिस येथील महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव प्रशांत गायकवाड आदींना अटक करुन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.यानंतर काही तासांनी आंदोलनकर्त्यांना सोडून देण्यात येणार असल्याचे समजते. या प्रकाराबाबत युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
Be First to Comment