धक्कादायक ! भाजपचे कळंबोली शहर सरचिटणीसांचा कोरोनाने मृत्यू ###
सिटी बेल लाइव्ह / कळंबोली / प्रतिनिधी ###
भाजपा कळंबोली सरचिटणीस राजेंद्रशेठ बनकर,यांच्यानर पनवेल,येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना बुधवारी ( दि 8 ).पहाटे ४ वाजता त्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. ते ५५ वर्षाचे असून त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
राजेंद्रशेठ बनकर यांना शुक्रवारी अस्वस्थ वाटायला वागल्यावर वीर हाँस्पिचल खांदा काँलनी येथे दाखल करण्यात आले होते त्यांच्या आरोग्य तपासणीत त्यांना कोरोना झाल्याचे समोर आले पण त्याच्यावर वेळीच उपचार न झाल्याने त्यांची प्रकृती खालावत गेली. त्यांना उपचार दरम्यान आँक्सिजन बेड उपलब्ध न झाल्याचे समजते बनकर यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आमदार प्रशांत ठाकूर यांना मिळताच त्यांनी बनकर यांना सोमवारी पनवेल येथील पँनासिया हाँस्पिटल मध्ये हलविण्यात आले तेव्हा खुप उशिर झाला होता. त्याची प्रकृतीत सुधारणा होत नव्हती व शरीर डाँक्टरांच्या उपचाराला साथ देत नव्हते शेवटी बुधवारी पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
राजूशेठ बनकर हे माथाडी कामगार व वाहतुकदारां बरोबर सर्वसामान्य जनतेचेसाठी काम करत होते. त्यांच्यासाठी त्याच्या मनात मोठी आस्था होती. त्यामुळे कोरोनाच्या महामारीत गरजू गोरगरीब, निराधाराना अन्न मिळावे त्यांच्यावर उपासमारीची वेळ येवू नये म्हणून लोकनेते रामशेठ ठाकूर व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या माध्यमातून अन्नाचे छत्र धरले होते ते या घटकापर्यत पोहचण्यासाठी बनकर यांनी मोठे योगदान दिले होते. त्यांनी कोरोना महामारीत हजारो लोकांना अन्यधान्य व आर्थिक स्वरूपात स्वखर्चातून मदत केली आहे 24 मार्च पासून ते हाँस्पिटलमध्ये दाखल होई पर्यत त्यांनी मदतीचा हात दिला. हे जनसेवेचे करत असताना त्यांनी स्वत:कडे दुर्लक्ष केले आणि शेवटच्या क्षणी अस्वस्थ वाटायला लागल्यावर स्वत:ला हाँस्पिटलमध्ये दाखल करून घेतले तेव्हा फार उशीर झाला होता.
Be First to Comment