सिटी बेल लाइव्ह / अंदमान #
अंदमान निकोबार बेटांना सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी भेट दिली. केंद्र सरकारने येथे सबमरीन ऑप्टिकल फायबर केबल टाकली आहे, त्यामुळे संपूर्ण बेटावर फोन-इंटरनेट कनेक्टिव्हिटी सुधारणार आहे.
हा प्रकल्प बीएसएनएलमार्फत पूर्ण झाला असून केबल समुद्राखालून टाकण्यात आली आहे. आता हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर अंदमान निकोबारला प्रति सेकंद 400 जीबी पर्यंत स्पीड मिळणार आहे.
जाणून घेऊयात त्यातील मुख्य गोष्टी :
● चेन्नई ते पोर्ट ब्लेअरपर्यंत समुद्राखालून 2 हजार 313 कि.मी. केबल टाकली आहे
● एकूण 1224 कोटींचा खर्च.
● ही केबल स्वराज बेट, लिटिल अंदमान, कार निकोबार, कामोरोता, ग्रेट निकोबार, लाँग आयलँड, रंगत येथे जाईल.
● पोर्ट ब्लेअरला प्रति सेकंद 400 जीबी पर्यंत आणि इतर बेटांवर 200 जीबी प्रति सेकंदाचा स्पीड मिळणार.
● बीएसएनएलने हा प्रकल्प 24 महिन्यांत समुद्रात केबल टाकून पूर्ण केला आहे.
● सुरुवातीला बीएसएनएलचे नेटवर्क कार्य करेल, नंतर खासगी कंपन्यांना संधी मिळेल, अंदमानला 4 जी सेवा देखील उपलब्ध होईल.
● या प्रकल्पाच्या सहाय्याने टेलि-एज्युकेशन, टेलि-हेल्थ, ई-गव्हर्नन्स, टुरिझम या क्षेत्रात लाभ मिळण्याची शक्यता आहे.
● प्रकल्प 2018 मध्ये सुरू केला होता आणि आज त्यांनी त्याचे उद्घाटन केले.
पंतप्रधान म्हणाले : 15 ऑगस्ट साजरा करण्यापूर्वी अंदमानच्या लोकांना ही भेट आहे. जेंव्हा लोक येतील, ते बराच काळ थांबण्याचा प्रयत्न करतील कारण तेथे आता कनेक्टिव्हिटीची समस्या नसेल, तसेच पर्यटनाला चालना मिळेल.
लवकरच पोर्ट ब्लेअरला जवळच्या इतर बेटांशी जोडण्यासाठी जलवाहिनी तयार केली जाईल, नद्यांना जोडून देशात यावर काम सुरू असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
Be First to Comment