
पुणे येथील राज्यस्तरीय स्पर्धेत पनवेलच्या खेळाडूंचा डंका; २ सुवर्ण अन् २ कांस्यपदकांवर कोरले नाव
पनवेल (प्रतिनिधी):
पुणे येथील जेजुरी येथे दिनांक ७ व ८ ऑगस्ट २०२६ दरम्यान पार पडलेल्या ‘स्टेट ज्युनिअर ओपन स्टेट तायक्वांडो चॅम्पियनशिप २०२६’ या राज्यस्तरीय स्पर्धेत ‘तायक्वांडो असोसिएशन ऑफ पनवेल शहर’च्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे. या स्पर्धेत उत्कृष्ट खेळ करत पनवेलच्या खेळाडूंनी २ सुवर्ण आणि २ कांस्यपदकांची लयलूट केली असून, सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
यामध्ये सुवर्णपदक राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र श्रीजय भगत , सुवर्णपदक राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र वीर भोईर, कांस्यपदक यथार्थ कदम, कांस्यपदक कुमारी गौरी कोळी, सुवर्णपदक विजेत्या श्रीजय भगत आणि वीर भोईर या दोन्ही खेळाडूंची पुणे (म्हाळुंगे) येथे आयोजित होणाऱ्या ‘५ व्या इंडिया तायक्वांडो क्योरुगी नॅशनल चॅम्पियनशिप २०२६-२७’ या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या यशामुळे पनवेल शहरासह संपूर्ण रायगड जिल्ह्यातून क्रीडाप्रेमींमधून आनंद व्यक्त केला जात आहे.
मान्यवरांकडून अभिनंदन आणि कौतुक:
यशस्वी खेळाडूंचे पनवेल महानगरपालिकेच्या नगरसेविका मा. दर्शना भोईर, तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष संदीप ओंबसे, सरचिटणीस अमजदखान (गफार) पठाण, खजिनदार डॉ. प्रसाद कुलकर्णी, तसेच पनवेल शहर तायक्वांडो असोसिएशनच्या अध्यक्षा ॲड. प्रज्ञा संदीप भगत, सचिव संजय भोईर, खजिनदार हेमंत कोळी आणि सहसचिव संदीप भगत यांनी विशेष कौतुक केले.
तसेच ‘वीर तायक्वांडो असोसिएशन ऑफ पनवेल’चे अध्यक्ष हरेश्वर भगत आणि सदस्य निखिल भोईर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी खेळाडूंचे अभिनंदन करत पुढील राष्ट्रीय स्पर्धेतील कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत


Be First to Comment