Press "Enter" to skip to content

स्थायी समितीची सभा  प्रशासनाच्या अपारदर्शक  कारभारामुळे तहकूब

दोन्ही कडच्या सदस्यांना विश्वासात घेत नसल्याचा ठपका

महामारी आड प्रशासनाने चौखुर उधळले खरेदी चे वारू

सिटी बेल लाईव्ह/ पनवेल ( नितिन देशमुख ) :
पनवेल महापालिकेची सोमवारची  स्थायी समितीची सभा  प्रशासनाच्या अपारदर्शक  कारभारामुळे  सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांनी  मागणी केल्याने अध्यक्ष प्रवीण पाटील यांनी प्रशासनाकडून माहिती दिली जाई पर्यंत तहकूब केली. पनवेल महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच  प्रशासनाच्या कारभारा विरुध्द सत्ताधारी आणि विरोधकांनी  एकत्र येऊन सभा तहकुबीची मागणी करण्याचा प्रसंग घडला आहे . 
  पनवेल महापालिकेची स्थायी समितीची सभा सोमवार 10 ऑगस्ट रोजी क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सकाळी 11 वाजता कोरोंना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना करणे व अन्य  विषयावर चर्चा करण्यासाठी बोलवण्यात आली होती. सभेपूढे  विषय पत्रिकेवर 39 विषय चर्चेला होते. महापालिकेने कोरोना विषाणू प्रतिबंधक उपाय योजना  करण्यासाठी  खरेदी केलेल्या हँड ग्लोव्हज ( नग 50,000 ) झालेल्या खर्चास व दरास मान्यता देण्याचा पहिलाच विषय चर्चेला आला असता. मागील सभेत प्रशासनाने तातडीने खरेदी करताना त्याबाबत माहिती  स्थायी समिति अध्यक्ष , सभागृह नेते आणि विरोधी पक्ष  नेत्यांना दिली जावी असे ठरले असताना ती दिली नसल्याचे लक्षात आल्याने सदस्यांनी हरकत घेऊन सभा तहकूब करण्याची मागणी केली
      अध्यक्ष प्रवीण पाटील यांनी प्रशासन स्थायी समितीला विश्वासात घेत नसल्या बद्दल सदस्यांच्या भावना लक्षात घेऊन जो पर्यंत कोरोना विषाणू प्रतिबंधक उपाय योजना करण्यासाठीच्या खरेदी बाबत प्रशासन कडून  माहिती दिली जात नाही तो पर्यंत स्थायी समितीची सभा तहकूब करण्याचा निर्णय घेतला  

महापालिका प्रशासन कोरोंना विषाणूच्या प्रतिबंधक उपाय योजना करण्यासाठी करीत असलेल्या खर्चाला आमचा विरोध नाही. पण त्यांनी त्याबाबत  माहिती देणे आवश्यक असताना दिली जात नाही.  मागील सभेत तातडीची खरेदी करताना अध्यक्ष,सभागृह नेते आणि विरोधी पक्ष नेत्यांना माहिती देण्यात यावी असे ठरले होते. लोकांचा पैसा व्यवस्थित वापरला जात नसेल तर तो खर्च नाकारण्याचा स्थायी समितीला अधिकार आहे  म्हणून आजची सभा तहकूब करण्यात आली.
…… परेश ठाकूर , सभागृह नेते

कोरोनाचा  संसर्ग  वाढत असताना अधिकारी काम करताना दिसत आहेत. कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजना करताना त्यासाठीच्या खर्चाची  माहिती अध्यक्ष,सभागृह नेते आणि विरोधी पक्ष नेत्यांना देण्याचे ठरले होते मला त्याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. हा जनतेचा पैसा असल्याने त्यामध्ये पारदर्शकता असायला हवी कारण उद्या खर्चाला मान्यता दिली म्हणून स्थायी समितीला जवाबदार धरले जाणार आहे.

….. प्रितम म्हात्रे , विरोधी पक्ष नेते

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.