तालुक्यातून दहावी परीक्षेत प्रथम आलेल्या सुजल बैकरचे अभिनंदन
सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे.(धम्मशिल सावंत)
ग. बा. वडेर हायस्कुलमधील सुजल विठ्ठल बैकर हा विद्यार्थी बेताच्या आर्थिक परिस्थितीवर मात करत जिद्द आणि मेहनतीने दहावी परीक्षेत 93.80 टक्के गुण मिळवून सुधागड तालुक्यातुन दहावी परीक्षेत प्रथम आला आहे. त्याच्या या उज्वल यशाचे सर्व स्थरातून कौतुक होत आहे.
सुधागड तालुका बौद्धजन पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सुजल बैकर याच्या घरी जाऊन त्याचे अभिनंदन व कौतुक करून भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी सुधागड तालुका बौद्धजन पंचायत समितीचे पदाधिकारी दिपक पवार, नरेश शिंदे, राजेश गायकवाड, मोरेश्वर कांबळे, राजेश जाधव, रोहिणी जाधव, नूतन शिंदे, मनीषा कांबळे, संजीवनी जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.
Be First to Comment