Press "Enter" to skip to content

आंबिवली येथे सोलर पॅनेल स्ट्रीट लाईटचे उद्घाटन

सिटी बेल ∆ कर्जत ∆ विजय मांडे ∆

मागील अनेक दिवसांपासून मौजे आंबिवली येथील स्ट्रीट लाईटची समस्या होती. माधवीताई जोशी युवा प्रतिष्ठानच्या वतीने सोलर स्ट्रीट लाईट लावण्यात आल्या. या स्ट्रीट लाईट चे लोकार्पण करण्यात आले.

आंबिवली रस्त्यावर लाईट नसल्याने रस्त्यावरील खड्डे, श्वापदांची भीती या अडचणींमुळे नागरिक पूर्णपणे त्रासून गेले होते. नागरिकांना वारंवार होणारी गैरसोय लक्षात घेऊन माधवी जोशी यांनी स्वतः जातीने या समस्येत लक्ष देऊन निराकरण केले आणि सोलर पॅनेल स्ट्रीट लाईट बसविण्यात आल्या. या स्ट्रीट लाईटचे उदघाटन माधवी जोशी आणि उद्योजक नरेश जोशी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. याप्रसंगी रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे, तानाजी टोकरे आदी उपस्थित होते.

सोलर पॅनेल स्ट्रीट लाईट लावण्याचा मार्ग कर्जत नेरळ रोड पासून ते आंबिवली गाव, स्मशानभूमी आणि संपूर्ण मंदिर परिसर असा आहे..या उद्घाटन सोहळ्यास कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.