Press "Enter" to skip to content

जिया गायकर हिची भरारी

इंग्लिश इंटरनॅशनल ओलम्पियाड परीक्षेत कु.जिया गणेश गायकर महाराष्ट्रात २ री

सिटी बेल ∆ कळंबोली ∆

इंडियन टॅलेंट ओलम्पियाड वतीने नोव्हेंबर 2022 मध्ये घेण्यात आलेल्या इंग्लिश विषयाच्या ( इंग्लिश इंटरनॅशनल ओलम्पियाड) परीक्षेत कळंबोलीच्या कार्मेल कॉन्व्हेंट शाळेची विद्यार्थिनी कु.जिया गणेश गायकर रा. कामोठे ही संपूर्ण महाराष्ट्रातून 2 री आली आहे.

संस्थेकडून मेडल, प्रशस्तीपत्र आणि रोख बक्षीस जून मध्ये तिला दिले जाणार आहे. शाळेच्या वतीने शिक्षक आणि मुख्यध्यापक यांनी कु. जिया हिचे शाळेत कौतुक करून शाळेच्या फालकावर तिचे अभिनंदनही केले आहे. जियाच्या या यशा बद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.