गेट बंद आंदोलनाच्या इशाऱ्याने सिडको प्रशासन वठणीवर
सिटी बेल ∆ कळंबोली ∆
भीमशक्ती संघटना आणि रिपब्लिकन सेना यांच्या माध्यमातून सिडकोचे मुख्य प्रवेशद्वार बंद करण्याचे आंदोलन येत्या दहा तारखेला आयोजित केले होते. या आंदोलनाला आपला संपूर्ण पाठिंबा जाहीर करत शेतकरी कामगार पक्षाच्या वाहतूक सेलचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्रभुदास भोईर यांनी राज्य माथाडी कामगार संघटनांची पूर्ण ताकद देखील या आंदोलनात घेऊन रस्त्यावर उतरणार असल्याची घोषणा केली होती. प्रभुदास भोईर यांच्या आंदोलनाच्या खणखणीत इशाऱ्यानंतर सिडको प्रशासन वठणीवर आलेले आहे.

खिडूकपाडा येथील ग्रामस्थांना मूलभूत सुविधा मिळत नसल्यामुळे हे आंदोलन उभारावे लागले होते. नुकतेच सिडकोच्या वतीने आंदोलन करताना नवी मुंबई मुख्यालयात बोलवून त्यांची समस्या ऐकण्यात आल्या. यातील बहुतांश मागण्यांवर तत्वतः मंजुरी मिळालेली असून अन्य कामांच्या साठी सिडकोचे शिष्ट मंडळ येत्या दोन दिवसात पाहणीसाठी येणार असल्याची सकारात्मक बाब प्रभुदास भोईर यांनी आमच्या प्रतिनिधीला सांगितली.
सिडको प्रशासना सोबत झालेल्या बैठकीत खालिल गोष्टी मंजुर करुन घेतल्या :
1. खिडुकपाडा गावाभोवतालचे रस्ते तसेच जे नोड रस्त्याचे लवकरात लवकर काँक्रीटीकरण
2. खिडुकपाडा गावाकरीता उद्यान
3. गावासाठी खेळाचे क्रिडांगण 4. समाज मंदिर
5. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन वापरासाठी खुले करणार, तसेच त्याची आवश्यक ती डागडुजी करणार
6. माथाडी भवन उभारण्यासाठी बाराशे मीटरच्या भूखंडाची तजवीज करणार

Be First to Comment