Press "Enter" to skip to content

९ व्या राष्ट्रीय थाई-बॉक्सिंग फेडरेशन कप स्पर्धेमध्ये खांदा कॉलनी मधील खेळाडूंनी केली सुवर्णपदकांची लयलूट

सिटी बेल ∆ गुवाहाटी ∆

दि.२७,२८,२९ जानेवारी २०२३ रोजी गुवाहाटी आसाम येथे झालेल्या ९व्या राष्ट्रीय थाई-बॉक्सिंग फेडरेशन कप स्पर्धेमध्ये खांदा कॉलनी मधील खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत सुवर्णपदकांची लयलूट केली आहे.

विजेत्या खेळाडूंची नावे पुढीलप्रमाणे :-
कु. प्रथम नीलकंठ बहिरा (१९ वर्षावरील वयोगट, ६० किलो वजन गट) सुवर्णपदक 🥇, **
कु. पल्लवी अशोक कणसे (१४ वर्षाखालील वयोगट, ५६ किलो वजनगट) सुवर्णपदक 🥇
कु. राजा लुकास नाडार (१४ वर्षाखालील वयोगट, ५६ किलो वजनगट) सुवर्णपदक🥇

सदर खेळाडू हे युनायटेड शोतोकान कराटे असोसिएशन इंडियाच्या खांदा कॉलनी शाखेत सेन्सेई प्रतिक ज. कारंडे (४ डिग्री ब्लॅक बेल्ट) यांच्याकडे कराटे आणि इतर मार्शल आर्टस् चे प्रशिक्षण घेत आहेत. विजेत्या खेळाडूंवर विविध स्तरावरून शुभेच्छांचा वर्षाव होत असून युनायटेड शोतोकान कराटे असोसिएशन इंडियाचे अध्यक्ष आणि थाईबॉक्सिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र चे चेअरमन डॉ. मंदार पनवेलकर सर, थाईबॉक्सिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र चे अध्यक्ष श्री. फरहान नबीजी आणि थाईबॉक्सिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र चे सचिव श्री. सागर कोळी सर यांनी विशेष कौतुक केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या..

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.