Press "Enter" to skip to content

महेश निमने यांच्या व्यवसायांचे १०१ उपाय पुस्तकांचे अनावरण

सिटी बेल ∆ काशिनाथ जाधव ∆ पाताळगंगा ∆

आज व्यवसाय प्रत्येक जण करीत असतो.या माध्यमातून आपल्याला नफा मिळेल मात्र पुरेसे ज्ञान नसल्यामुळे नव तरुण मोठ्याप्रमाणावर नुकसान होत असतात.मात्र तसे होवू नये यासाठी महेश निमने यांच्या पुस्तक लिखितामधून व्यवसायांचे १०१ उपाय पुस्तकांचे अनावरण येथे जेष्ठ नागरिक सभागृह खोपोली येथे करण्यात आले.

या पुस्तकांच्या माध्यमातून नव व्यवसायिकांना अनमोल मार्गदर्शन मिळणार आहे. आर्थिक स्थैर्य प्राप्तीसाठी, व्यावसायिक यश, स्मार्ट वर्कर नफा,विद्यार्थी निवृत्त वर्गाला व्यवसाय, एक पाऊल सेल्स आणि मार्केटिंग यांचा अभ्यास आत्मविश्वास वाढवण्यास मदत,तसेच खचलेल्या मनाला स्मृतीसाठी, व्यापार भरभरासाठी, नवीन व्यवसाय चालला देण्यासाठी, साईट बिजनेस करू इच्छितांसाठी उत्पादन विक्री सर्विस,
,युवा उद्योजक,नोकरदार वर्ग ,शेतकरी, गृहिणी,जेष्ठ नागरिक यांना उपयुक्त असे १०१ उपाय पुस्तकात असून सर्व क्षेत्रांसाठी हे पुस्तक अतिषय महत्वाचे आहे.

यावेळी पुस्तकांचे अनावरण करण्यासाठी उपस्थित पाहुणे म्हणून डॉ. सुभाष कटकदौंड, आनंदराव गणेशकर सर (माजी शिक्षक,खोपोली उपनगराध्यक्ष राजु गायकवाड मनसे तालुका अध्यक्ष – विजय सावंत, एच डी एफ सी बँक,व्यवस्थापक रवी मोहिते – जेष्ठ नागरिक सभा खोपोली अध्यक्ष,नारायण चौधरी, जेष्ठ नागरिक सभा खोपोली कोषाध्यक्ष- प्रवीण वेदक ,शेअर मार्केट उद्योजक रविंद्र अवथनकर, पत्रकार प्रशांत गोपाळे, ब्राम्हण सभेचे अध्यक्ष – अनिल कुमार रानडे , सचिव – आंबादास पाठक, तबला, गायन संगित शिक्षक – रविंद्र कुलकर्णी अदि उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.