Press "Enter" to skip to content

वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात विद्यार्थ्यांच्या उपस्थित ‘रेझिंग डे’ साजरा

आनंद विश्व गुरूकुल महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केली पोलिसांशी मैत्री

सिटी बेल ∆ महाड ∆ रघुनाथ भागवत ∆

देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 2 जानेवारी 1961 रोजी महाराष्ट्र पोलिस दलाला त्यांचा स्वतंत्र ध्वज सुपूर्त केला तेव्हापासून केंद्र सरकारने हा दिवस महाराष्ट्र पोलीस दलाचा रेझिंग डे (ध्वज प्रदान दिन) म्हणून घोषित केला आहे.

जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात 2 जानेवारी ते 8 जानेवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन करून पोलीस ‘रेझिंग डे’ सप्ताह साजरा केला जातो. यानिमित्ताने ठाणे येथील आनंद विश्व गुरूकुल महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, पत्रकारितेचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी ठाणे वागळे इस्टेट पोलीस ठाण्याला भेट दिली. त्यांना पोलीस खात्याचे विभागीय कामकाज आणि शस्त्रांचीही माहीती विद्यार्थ्यांना देण्यात आली.

२४ तास ऑन ड्युटी असणाऱ्या पोलिसांचे कामकाज कसे चालते याविषयी विद्यार्थ्यांना व सर्वसामान्य लोकांना माहिती व्हावी यासाठी शाळेतील विद्यार्थ्यांच्या पोलीस ठाण्यांना भेट आयोजित केल्या आहेत. असे सप्ताह विषयी बोलताना ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र राठोड यांनी सांगितले. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय मुतडक यांनी मोबाईल चोरी गेल्यावर उपाय व ऑनलाईन फसवणुकीपासून सावधानी कसे बाळगावी याचे धडे दिले.

वाहतूक विभागाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतना चौधरी यांनी वाहतूकीचे नियम पाळले नाही, तर त्याचे दुष्परिणाम विद्यार्थ्यांना समजावून त्यावर आकारल्या जाणाऱ्या दंडांची माहिती दिली. तसेच पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील यांनी शस्त्रांची माहिती देऊन, विभागीय कामकाजाची माहिती दिली. अंमली पदार्थ विभागाचे पोलीस हवालदार अनिल पटेकर यांनी सिंम्बा (श्वान) याची ओळख करून त्या दोघांमधील बंधन विद्यार्थ्यांना दाखवून दिले. यावेळी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे केंद्र संचालक शशिकांत कोठेकर, सहाय्यक आकाश ढवळ व आनंद विश्व गुरूकुल विद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. विदिशा शिंदे उपस्थित होत्या.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.