Press "Enter" to skip to content

पीएनपीच्या विद्यार्थ्यांची जिद्दीची अनोखी कहाणी

दिपालीने परिस्थितीवर तर प्रतीक्षाने अपंगत्वावर मात करत केले यश संपादन

सिटी बेल लाइव्ह / अमोल नाईक / अलिबाग #

प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीची श्रीवर्धन तालुक्यातील माध्यमिक शाळा वडवली मधील विद्यार्थिनी दिपाली काशिनाथ खोपकर या आदिवासी समाजातील विद्यार्थिनीने एस. एस. सी. २०१९ – २०२० या परीक्षेत ७७. ८० टक्के गुण मिळवले, शिक्षणाला परिस्थिति आडवी येत नाही हे दिपालीने दाखवून दिले तर मुरुड तालुक्यातील पी.एन.पी. माध्यमिक शाळा काकळघर महालुंगे शाळेतील विद्यार्थिनीने बालपणापासून नशिबी आलेल्या अपंगत्वावर मात करत ७८.४० टक्के गुण संपादन केले. या दोन्ही विद्यार्थिनीने जे घवघवीत यश संपादन केले या बद्दल संस्थेचे अध्यक्ष आ. जयंत पाटील, कार्यवाह चित्रलेखा नृपाल पाटील यांनी यशस्वी विद्यार्थिनींचे आणि यांना घडविणारे मुख्याध्यापक नितिन मोकल, वंदना मेहेतर, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे अभिनंदन केले.

दिपाली खोपकर हि कुडकी आदिवासी वाडीतील आदिवासी समाजातील विद्यार्थिनी, घरातील परिस्थिती अत्यंत बिकट, त्यातच वडिलांचे छत्र हरवलेले त्यामुळे घरची जबाबदारी आई सिताबाई यांच्यावर पडली, आपण स्वत: शिकलो नाही मात्र आपल्या मुलीने उच्चशिक्षत व्हावे या साठी आईने रात्रदिवस काबाडकष्ठ केले. घरात लाईटची व्यवस्था नसताना सुद्धा दिपालीने अभ्यासाची जिद्द सोडली नाही, मेणबत्तीच्या प्रकाशावर अभ्यास केला. सुट्टीच्या दिवशी सुद्धा ती मोल मजुरी करण्यासाठी जात असे. मुळत: दिपाली हुशार असल्याने तिचे शिक्षण खंडित होऊ नये म्हणून पीएनपी संस्थेच्या मदतीने धवल तवसाळकर आणि त्यांच्या हेल्प मित्रमंडळाच्या ग्रुपने दिपालीला दत्तक घेतले आणि तिच्या शैक्षणिक खर्चाची जबाबदारी उचलली. यांच्या उपकारची परतफेड म्हणून ७७.८० गुण मिळवून शाळेत द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली. शिक्षणाला परिस्थिती आडवी येत नाही हे दिपालीने दाखवून दिले.

एस. एस. सी. परीक्षेत घवघवीत यश संपादन केल्यामुळे आदिवासी समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. या पुढे तिला विज्ञान शाखेत प्रवेश घेवून उच्चशिक्क्षित होऊन मोठी अधिकारी होण्याचे तिचे स्वप्न आहे.

तर दुसरी विद्यार्थिनी मुरुड तालुक्यातील पी.एन.पी. माध्यमिक शाळा काकळघरची बालपणापासून नशिबी आलेल्या अपंगत्वावर मात करत प्रतीक्षा दत्ताराम रामाणे हिने ७८.४० टक्के गुण मिळवून यशाला गवसणी घातली.

अपंगत्वावर मात करत आपल्या आई वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवत वांदेली गावातील प्रतीक्षा रामाणे हिने यश संपादन केले.

तिच्या जन्माची कहाणी फारच वेगळी, जन्मतःच तिला उभं राहतं येत नसून कमरेपासून तिला लुळेपणा आहे ती दोन पायावर उभी सुद्धा राहू शकत नाही. शिक्षणासाठी तिला रोज सकाळी 3 किलोमीटर येण्यासाठी आणि 3 किलोमीटर संध्याकाळी जावे लागत असे 6 वर्ष तिच्या आईने खडतर रस्त्याने व्हील सायकलच्या माध्यमातून ने – आन केले. आई – वडिलांची धडपड, शिकविण्याची जिद्द आणि त्या जिद्दीचे तसेच तिच्या कष्टाचे जे यश संपादन केले ते खरचं नेत्रदीपक आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.