सिटी बेल ∆ वहाळ ∆ सुनिल ठाकूर ∆
निरोगी जीवनाचा आधार आयुर्वेदाचा संचार या उद्देशाने टॉप टाइम् प्रा.लिमिटेड डेल्टास फार्मा यांच्या वतीने नुकतेच श्री साई नगर वहाळ येथील साई मंदिर येथे सलीम् शेख व रवींद्र राणा यांनी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरात डॉ. दीक्षित ,सलीम शेख ,सायराबांनो शेख ,बलराज झिरे ,रवींद्र राणा अमोल शिरसाठ, अर्जुन कुराडे,आदीनी वजन ,बीपी.शुगर, ऑक्सिजन तसेच कॅल्शिअम , दमा , खोकला , सांधे दुखी ,रक्त दाब मधुमेह ,पित्त,पाचन संबंधी आजार ,थॉयरॉईड, नेत्र विकार , मानसिक तणाव,आदी ची तपासणी केली .
सदर शिबिरास साई देवस्थान चे अध्यक्ष रवीशेठ पाटील ,मा.जि. प.सदस्या सौ .पार्वती ताई पाटील , जगन शेठ पाटील , विश्वास पाटील ,एकनाथ ठाकूर आदी सह साई भक्त ,शिबिरार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
सदर शिबिरास उत्तम प्रतिसाद लाभला.
Be First to Comment