Press "Enter" to skip to content

पनवेल अर्बन बँक निवडणूक

पनवेल अर्बन बँकेवर महाविकास आघाडी चे वर्चस्व : सर्वसाधारण मतदार संघातील आठही जागांवर विजय, उरलेल्या पाचही जागांवर विजयी होण्याचे स्पष्ट संकेत

पनवेल ∆ सिटी बेल ∆

पनवेल अर्बन बँकेवर महाविकास आघाडी ने आपले वर्चस्व राखले असुन सर्वसाधारण मतदारसंघातील आठही जागांवर विजय संपादन केला आहे. उरलेल्या अनुसूचित जाती जमाती, इतर मागासवर्ग, महिला राखीव व भटक्या विमुक्त जाती जमाती व विशेष मागासवर्ग या पाच जागांसाठी झालेले मतदान अद्याप मोजणी होणे बाकी आहे. मात्र एकूण बारा जागांपैकी आठ जागांवर विजय मिळवून महाविकास आघाडीने ही बँक आपल्याच ताब्यात राहणार हे नक्की केले आहे. उरलेल्या पाच जागांवर देखील महाविकास आघाडीचं विजय होईल असे स्पष्ट चित्र दिसत आहे.

भारतीय जनता पक्ष विरूद्ध शेकाप, उध्दव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, आणि काॅंग्रेस यांच्या महाविकास आघाडी ने पनवेल मधील बहुचर्चित पनवेल अर्बन बँकेचे निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.

काल या बॅंकेच्या १३ संचालक पदासाठी निवडणूक पार पडली तर आज त्याची मतमोजणी पनवेल मधील व्हि के हायस्कूल येथे पार पडत आहे. आत्तापर्यंत आलेल्या माहितीनुसार सर्वसाधारण मतदारसंघातील आठही जागांवर महाविकास आघाडी ने बाजी मारली असून फक्त अधिकृत घोषणा होण्याची बाकी राहिले आहे.

सर्वसाधारण मतदारसंघातील विजयी उमेदवार खालील प्रमाणे

दिलीप कदम

अनिल केणी

राजेश खानावकर

प्रविण जाधव

जनार्दन पाटील

ज्ञानेश्वर बडे

बळीराम म्हात्रे ( बी.पी.म्हात्रे सर )

हितेन शहा

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.