Press "Enter" to skip to content

गणेश बेंझोप्लास्ट मध्ये थरार नाट्य

रसायनाची गळती होऊन लागली आग, एक कामगार अडकला… वाचा पुढे काय झालं ?

सिटी बेल ∆ उरण ∆

उरण येथील गणेश बेंझोप्लास्ट लिमिटेड, बल्क टर्मिनल,  जे एन पी टी ,  या ठिकाणी कारखान्यातील टँक 104 शी निगडित असलेल्या पंप 104 च्या सक्शन लाईन मधून रसायनाची गळती झाल्यामुळे सदर पंपाचे फ्लांज टाईट करताना नटबोल्ट जमिनीवर पडल्याने आग लागून त्या ठिकाणी एक कामगार अडकल्याचा प्रसंग निर्माण झाला. त्यानंतर कामगारांनी ही आग आटोक्यात आणली. मात्र हा प्रसंग खरा नसुन ती एक माॅक ड्रील होती. आणी कंपनी प्रशासनाने ती अत्यंत उत्तम रित्या पार पडली.

The Manufacturer Storage and Import of Hazardous Chemical Rule, च्या नियम 14 मधील तरतुदी अन्वये कारखान्यांमध्ये प्रतिवर्षी बाह्य आपत्कालीन आराखड्याची सराव चाचणी ( रिहर्सल ) घेणे बंधनकारक आहे. सदर तरतुदी अन्वये मेसर्स गणेश बेंझोप्लास्ट लिमिटेड, बल्क टर्मिनल, जे एन पी टी , या ठिकाणी शुक्रवार दिनांक 25 /11/ 2022 रोजी बाह्य आपत्कालीन आराखड्याची पूर्वनियोजित कवायत घेण्यात आली होती.

कारखान्यातील टँक 104 शी निगडित असलेल्या पंप 104 च्या सक्शन लाईन मधून रसायनाची गळती झाल्यामुळे सदर पंपाचे फ्लांज टाईट करताना नटबोल्ट जमिनीवर पडल्याने आग लागून त्या ठिकाणी एक कामगार अडकल्याची रूपरेषा कवायतीच्या वेळी नियोजित करण्यात आली होती.

अशा प्रकारच्या कवायती आयोजित करण्यामागे आपत्कालीन परिस्थितीत कारखान्यातील कामगारांची असलेली पूर्वतयारी व आग विझवतेवेळी कारखान्यात असलेली उपकरणे सुरक्षित व कार्यान्वित असल्याबाबत तसेच शासकीय संस्थांचा प्रतिसाद कालावधी पाहणे हा प्रमुख उद्देश असून अशावेळी कारखान्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्री ब्रीफिंग तसेच पोस्ट ब्रीफिंग करण्यात येते.

प्रत्यक्ष कवायतीच्या वेळी, जेएनपीटी फायर सर्विस, पोलीस, मेडिकल सर्विस, मार्ग ग्रुप, चे सर्व मेंबर्स यांनी तातडीने प्रतिसाद दिला. सदर मॉक ड्रिल चे सर्वत्र कौतुक होत असून M/S गणेश बेंझोप्लास्ट या कंपनीने आयोजित करण्यात आलेल्या कवायती (माँक ड्रिल) मधून आपत्कालीन परिस्थिती कशा प्रकारे हाताळण्यात यावी या विषयाची चांगल्या प्रकारे माहिती मिळाली असल्याचे मत दीपक फर्टीलायझर, अलाना, रिलायन्स, आय.ओ.सी.एल, सुरज ऍग्रो, तसेच आय.एम.सी, सारख्या शेजारील कंपनीने प्रदर्शित केले तर अग्निशमन सेवेसारख्या अत्यावश्यक सेवेचा प्रतिसाद कालावधी कमीत कमी करण्याकरता रस्त्यावर उभे असलेल्या रासायनिक टँकरची वाहतूक योग्यरित्या नियोजित करणे आवश्यक असल्याची सूचना जे.एन.पी.टी चे अग्निशमन अधिकारी श्री कर्णिक यांनी केली.

सदर कवायत औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय तसेच तहसीलदार यांच्या सल्ल्यानुसार व कंपनीचे श्री श्याम निहाते,श्री आशुतोष पाटील, श्री सचिन सस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली असून यामध्ये श्री साजिद अहमद टर्मिनल प्रबंधक आय.ओ.सी.एल यांनी परीक्षक म्हणून काम केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.