शिवसेनाप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी कर्जत येथील सभेत केले काँग्रेसचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत यांचे भरभरून कौतुक

निष्ठावंत नेत्याचा हा खरा सन्मान उमेदवारी मिळाली नाही , रायगड मध्ये काँग्रेसला एकही सीट दिली नाही म्हणून किंतू परंतु न ठेवता मनापासून तन मन धन अर्पण करून काम करणारा नेता … काँग्रेस जिल्हा अध्यक्ष श्री. महेंद्र शेठ घरत यांचे ” खरा निष्ठावंत ” म्हणून माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांनी कर्जत येथील महाविकस आघाडीच्या जाहीर प्रचार सभेत कौतुक केले.

शिवसेनाप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या कर्जत येथील सभेत त्यांनी काँग्रेसचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत यांचे भरभरून कौतुक केले. ते म्हणाले की, रायगड जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला एकही जागा आम्ही देऊ शकलो नाही. काँग्रेस पक्षाचा निष्ठावान म्हणून महेंद्र घरत यांना याबद्दल वाईट वाटणे स्वाभाविक होते. महेंद्र घरत यांनी त्यांच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देखील दिला. परंतु निवडणुकांचे रणशिंग फुंकल्यावरती वैयक्तिक नाराजी दूर करून महाविकास आघाडीच्या विजयासाठी ते तन मन आणि धन अर्पण करून प्रचार करत आहेत. सच्चा निष्ठावान कसा असतो याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे महेंद्र शेठ घरत.




Be First to Comment