Press "Enter" to skip to content

खाजगी बस ला टेंपो ची धड़क

तीन प्रवासी गंभीर ज़खमी; बस २० फूट खद्द्यात पड़ली

सिटी बेल : खोपोली: गुरुनाथ साठिलकर

आज दिनांक 21- 11- 2024 रोजी पहाटे 03.00 वाजण्याच्या सुमारास सांगोला ते मुंबई खाजगी बस क्र. MH-03-CV-5853 या बसमधून एकूण 11 प्रवासी मुंबई करता येत असताना किलोमीटर 35.200 या ठिकाणावरून जात असताना पाठीमागून एक कोंबडी वाहतूक करणारा टेम्पो क्रं. MH-14-HU-1069 याचा ब्रेक फेल होऊन सदर बसला पाठीमागे ठोकल्याने सदरची बस एक्सप्रेस हायवे सोडून रोड बाजूस 20 फूट खड्ड्यात पलटी झाली सदर बस मधील ड्रायव्हर सहित 11 प्रवासी यांना आय आर बी चे देवदूत पथक ,खोपोलीचे अपघात पथक, एचएसपी व खोपोली पोलीस स्टेशनच्या यंत्रणेने सुखरूपणे बाहेर काढून त्यांना किरकोळ स्वरूपाच्या दुखापती झाल्याने खोपोली नगरपालिका रुग्णालयात उपचार करून त्यांना सोडण्यात आलेले आहे.

कोंबडी वाहतूक करणाऱ्या टेम्पो मधील तिनं गंभीर जखमी ईसमांना एमजीएम हॉस्पिटल कळंबोली या ठिकाणी रवाना केलेले आहे.सदर अपघात खोपोली पोलीस स्टेशन हद्दीत झाला आहे.

अपघाताचा अधिक तपशील

1) टेम्पो (कोंबडी वाहतूक)नं MH- 14HU1069
2) अरुण ट्रॅव्हल्स बस नं MH-03 CV 5853

अपघातामधील जखमी
गंभीर(MH- 14HU1069)
1) शाहिद मोहम्मद
2) इरफान अयुब खान
3) कैफ शेख महम्मद इनामदार

किरकोळ जखमी(MH-03 CV 5853) मधील
1) एम. रविचंद्रन-42 (चालक)
2) भाऊसाहेब जगन्नाथ कदम-42
3) इंद्रजित काशीद वय-09
4) स्मिता माने वय-45
5) आक्काताई मधुकर काशीद-55
6) सुभाष काशीद – 42 अ.न. 2 ते 6 रा. जवळा, लोणवीरे ता. सांगोला, सोलापूर

सांगोलाच्या मंडळींचा यामध्ये समावेश होता. पाच साधारणता किरकोळ जखमी असलेल्या व्यक्तींना एमजीएम रुग्णालय कामोठे येथे शिफ्ट केले आहे. उर्वरित सर्वजण सुस्थितीत आहेत.
आता परिस्थिती संपूर्ण कंट्रोल मध्ये आहे.
अंधार असल्याकारणाने गाडी सकाळच्या वेळी बाहेर काढण्यात येईल.
एकदा संपूर्ण बस चेक केली जात आहे.
वाहतुकीला कोणत्याच प्रकारचा अडथळा नाही.
आय आर बी पेट्रोलिंग,
देवदूत यंत्रणा
महाराष्ट्र सुरक्षा बल
डेल्टा फोर्स.
अपघात ग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था.
लोकमान्य ॲम्बुलन्स.

महामार्ग वाहतूक पोलीस यंत्रणा बोरघाट
खोपोली पोलीस स्टेशन
असे सर्वजण या ठिकाणी कार्यरत आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.