Press "Enter" to skip to content

कुंपणच जेव्हा शेत खातं !

अध्यक्षांनी केली देवस्थानच्या जागेची परस्पर विक्री : सदस्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

सिटी बेल ∆ पेण ∆ वार्ताहर ∆

पेण तालुक्यातील वढाव ठाकुर बेडी गावातील श्री कालभैरव देवस्थान ट्रस्टला दान केलेली जागा परस्पर विक्री केल्याचा आरोप ट्रस्टच्या उपाध्यक्षांसह सदस्यांनी रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रारद्वारे केली आहे.

तालुक्यातील मौजे बोर्झे या महसुली गावाच्या हद्दीतील ग.नं. ४५७ एकूण क्षेत्र ०.२४.८० ही जमीन कसवणुकदार म्हणून १९९२ मध्ये मधु लक्ष्मण ठाकुर यांचे नांव होते त्यानंतर कालभैरव देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष राम हसु ठाकुर यांनी आपले वडील हसु माया ठाकूर यांचे नाव दिले. मात्र हसु ठाकुर हे १९७५ ला मयत झाले असल्याने नियमाप्रमाणे व रिवाजाप्रमाणे ठाकुर बेडीचेच भावबंध या दिवाबत्तीचा खर्च करत होते.त्यामुळे राम ठाकुर यांनी संबंधित तलाठ्याना हाताशी धरून खोट्या पद्धतीने फेरफार सदरी नोंद केली असल्याचा आरोप या ट्रस्टचे उपाध्यक्ष सुधाकर ठाकूर आणि सदस्स्यांनी केला आहे.

याबाबतची सखोल चौकशी व्हावी याकरिता संबंधितांनी अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रारी अर्ज केला असल्याचे उपाध्यक्षासह सदस्यांनी सांगून यांनी राम ठाकुर यांनी फक्त ही जागा आपल्या नावावरच केली नाही तर २३.८० गुंठे जागेमध्ये ट्रस्टची असणारी साडेचार गुंठे जागा देखील सन २०१८ रोजी परस्पर विक्री केल्याने याची दुय्यम निबंधक कार्यालय पेण येथे दस्त क्रमांक २६०६ दिनांक १ डिसेंबर २०१८ प्रमाणे नोंद झाली आहे.त्यामुळे ही दिशाभूल असून देवस्थानच्या ट्रस्टची जागा परस्पर विकणाऱ्यावर तात्काळ करवाई करावी याकरिता आम्ही जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली असल्याचे त्यांनी यावेळी पत्रकार परिषदेत सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.