Press "Enter" to skip to content

कर्जत तालुका वकिल संघटनेच्या अध्यक्षपदी ॲड प्रविण खडे यांची बिनविरोध निवड

सिटी बेल ∆ कर्जत ∆ संजय गायकवाड ∆

कर्जत दिवाणी न्यायालयातील कर्जत तालुका वकिल संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा काल दि.11 नोव्हेंबर रोजी पार पडली व त्यामध्ये सन 2022-23 या वर्षाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकी संदर्भात चर्चा करण्यात आली.

संघटनेचे मावळते अध्यक्ष अॅड. सी. बी. ओसवाल यांनी अध्यक्ष पदावरुन पायऊतार होण्याचे जाहिर केल्यानंतर नवीन अध्यक्ष निवडीकरीता इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागविण्यात आले होते. मात्र अॅड. प्रविण शांताराम खडे यांचे व्यतिरिक्त अन्य कोणीही अध्यक्षपदाकरीता इच्छुक नसल्याकारणाने त्यांची कर्जत तालुका वकिल संघटनेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. तसेच अॅड. अनिल पाटील यांची उपाध्यक्ष म्हणून एकमताने निवड करण्यात आली.

सदरील अध्यक्ष निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये अॅड. दिपक गायकवाड यांनी महत्वाची भूमीका बजावली. सदर प्रसंगी संघटनेचे माजी अध्यक्ष अॅड. सतिश डायरे तसेच संघटनेचे माजी पदाधिकारी अॅड.अमोल सुर्यवंशी व संघटनेचे सभासद अॅड. शैलेश पवार, अॅड. वसंत रवणे, अॅड. शिल्पी परदेशी, अॅड. रूपेश पाटील, अॅड. ऋषिकेश कांबळे, अॅड. जयेश म्हसे, अॅड. शरद सावंत, अॅड. भारत सावंत, अॅड. गितेश सावंत, अॅड. थोरवे, व इतर वकील सभासद हजर होते.

संघटनेचे मावळते अध्यक्ष अॅड. सी. बी. ओसवाल यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्षांचा सत्कार करुन कार्यभार त्यांचेकडे सोपवला. सर्वांनी नवनिर्वाचित अध्यक्षांचे अभिनंदन करुन त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.