नाट्यमय घडामोडीतून मानपाडा पोलिसांनी अपहरीत बालकाची केली सुरतेहुन सुटका
सिटी बेल ∆ डोंबिवली ∆ संजय कदम ∆
डोंबिवलीमधून बालकाचे अपहरण झाले असताना नाट्यमयरित्या घडामोडीतून मानपाडा पोलिसांनी अपहरित बालकाची अखेरीस सुटका केल्याने मुलाच्या कुटुंबियांच्या डोळ्यात आनंदाश्रु उभे राहिले.
डोंबिवली येथील रणजीत सौमेंद्र झा (वय ४२) यांचा १२ वर्षाचा मुलगा रूद्रा हा ट्युशनसाठी गेला असता तो पुन्हा परतलाच नाही. थोड्या वेळात झा यांना फोन आला की, “आपका लडका हमारे पास है. बच्चा चाहते हो, तो एक करोड रूपये का इंतजाम करो वरना बच्चे को जान से मार देंगे.”
त्यानंतर तत्परतेने झा यांनी मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. सदर गुन्हयामध्ये खंडणीसाठी अल्पवयीन मुलाच्या जीवाला धोका असल्याचे गांभीर्य ओळखुन पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अपहृत मुलाच्या तपासासाठी विविध २० पथके तयार करण्यात आली. प्राथमिक तपासात आरोपी यांनी निसान कंपनीच्या ‘ट्रॅट्सन गो’ या पांढऱ्या रंगाचे गाडीतुन अपहरण केल्याचे व ते गाडीसह डोंबिवली, बदलापूर, खडवली, जव्हार मार्गे पुढे गेल्याचे निष्पन्न झाले. अपहरणातील गाडीचा माग काढण्यासाठी पोलिस पथके जव्हार मोखाडा परिसरात रवाना झाली परंतू आरोपींनी बनावट नंबर प्लेटचा वापर मुख्य रस्त्याचा वापर न करता आडमार्गाने, गाव खेड्यातून गाडी नेली.
दुसऱ्या दिवशी आरोपीने पुन्हा पुर्वीच्याच चोरीच्या मोबाईलवरून फिर्यादी यास धमकीचा कॉल केला. “तुम मुझे सिरीयस नही ले रहे हो. अब तुम्हे एक नहीं देड करोड रूपये मुझे देने होंगे ०३ घंटे में पैसे का बंदोबस्त करो जादा होशियारी की तो इसकी बहुत बडी किमत तुम्हे चुकानी पड़ेगी ” अशी धमकी दिली.
आतापर्यंतचे तपासावरुन आरोपी हे सराईत गुन्हेगार असून तपास आव्हानात्मक असल्याची जाणीव पोलिसांना झाली. आरोपी व अपहृत मुलाचा शोध घेण्यासाठी नाशिक परिसरात पोलिसांचे एक पथक नाशिक येथे पोहोचले. यावेळी सदर पथकांने स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने अपहरीत मुलाच्या शोधासाठी भद्रकाली व आसपासचा परिसर पिंजून काढला. तेव्हा पोलिसांना असे लक्षात आले की आरोपी हा फक्त पोलिसांची दिशाभूल करण्यासाठीच नाशिकला आला होता. दरम्यानच्या कालावधीत जव्हार, मोखाडा परिसरात तपास करणारे वपोनि अशोक होनमाने यांच्या पथकाला आरोपीची गाडी नाशिक येथून जव्हार दिशेने भरधाव वेगात जाताना दिसली. म्हणून त्यांनी लागलीच काही अंतरावर पाठीमागे असणारे सपोनि सुनिल तारमळे व सपोनि अविनाश वनवे यांना आरोपीचा रस्ता अडविण्यास सांगितले. एवढयात सुसाट वेगाने येणाऱ्या आरोपीने त्याच्या कडील निसान कंपनीची चारचाकी गाडी अटकाव करणाऱ्या पोलीसांचे अंगावर घालण्याचा प्रयत्न करून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या जंगलात शिरला व तेथून गाडी सोडून देवून पायी दरीमध्ये पळून गेले.
यावेळी तेथे उपस्थित सर्व पोलिस पथके, डॉग स्क्वॉड, तसेच स्थानिक, जव्हार पोलिस उपविभागीय अधिकारी प्रशांत परदेशी यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने सर्व दरी व जंगल परिसर पिंजून काढला. त्यासाठी तेथील पंचक्रोशीतील नागरीकांची व युवकांची मदत घेण्यात आली तसेच माहिती देणाऱ्यास ५०,०००/- रु बक्षीस जागेवर दिले जाईल असे जाहिर करण्यात आले.
त्याप्रमाणे स्थानिकांचे मदतीने सर्व जंगल परीसर पिंजून काढण्यात आला, परंतू पुढे अंधाराचा फायदा घेत आरोपी पसार झाले. यावेळी मिळालेल्या आरोपीच्या गाडीची झडती घेतली असता गाडीत दोन धारदार सुरे, तसेच अपहृत मुलाची चप्पल व शाळेची वही अशा वस्तू मिळाल्या. तसेच आरोपी यांनी सदर गाडीला एम.एच. ०२ सीआर ९७१३ व एम.एच ०२ सीआर ९९३७ अशा वेगवेगळया नंबर प्लेटचा वापर केल्याचे लक्षात आले. आतापर्यंतचे तपासावरुन सदर गुन्हयाचा मास्टरमाईंड आरोपी हा फरहदशाह फिरोजशहा रफाई असल्याचे लक्षात आले, तसेच त्याचा पुर्व इतिहास तपासता त्याचेवर गुजरात येथे डबल मर्डर, घरफोडी, अवैध दारु विक्री असे अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती प्राप्त झाली होती. तसेच आरोपीच्या गाडीत घातक हत्यारे सापडल्याने व अपहृत मुलगा आरोपी यांच्यासोबत मिळून न आल्याने गुन्हा अधिक संवेदनशिल तसेच गुंतागुतीचा होत चालला होता. त्यामुळे यापुढे अपहृत मुलाचा प्राण वाचविणे हेच उद्दिष्ट ठेवून अधिक संवेदनशिलपणे तपास सुरू ठेवण्यात आला.
दरम्यान गोपनीय माहिती तसेच तांत्रिक विश्लेषणाआधारे आरोपी हे जंगलातून पालघर बाजुकडून गुजरातकडे पलायन करीत असल्याची माहिती मिळाली. स्थानिक पालघर पोलिस तसेच गुजरात राज्यातील स्पेशल ऑपरेशन ग्रुप यांच्या मदतीने तलासरी – अच्छाडनाका परिसरात बंदी लावली. परंतू आरोपी याने पोलिसांना चकवा देत मुख्य रस्त्यावरून न येता आडमार्गे गावखेड्यातून वेळोवेळी वाहने बदलून पळून गेला.
आरोपी अपहृत बालकासह त्याचे मुळगावी गुजरात राज्यातील भावनगर व सुरत येथे जाण्याची शक्यता असल्याने गुजरात राज्यातील भावनगर व सुरत येथे पथके रवाना झाली. त्यानंतर पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, आरोपी याने त्याच्या पालघर येथील घरातील सर्व सामान एका मालवाहू टेम्पोमध्ये सुरतला पाठविले आहे.
यावरुन हे सामान कुठल्यातरी माल वाहतुक वाहनाने सुरतला नेले असण्याची शक्यता पडताळणीसाठी सुरत या ठिकाणी असलेल्या टिमला निर्देश देण्यात आले की, महाराष्ट्रातुन सुरतकडे सामान आलेल्या सर्व मालवाहतुक वाहने चेक करा. त्यामुळे महाराष्ट्राचा नंबर असणारे पालघर जिल्हयातील सर्व वाहने व त्यांचे चालक व क्लीनर यांचेकडे चौकशी करणेबाबत पथकास निर्देश देण्यात आले.
या माहितीवरून यापूर्वीच सुरत येथे असणाऱ्या पथकाने मालवाहू टेम्पो शोधून त्याच्या चालकाकडे चौकशी केली. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सुरत येथील पथकाने आरोपीचे घर शोधून काढले व घरात अपहृत बालक सुरक्षित असल्याची खात्री करून घरावर छापा टाकला.
यात मुख्य आरोपी फरहदशहा फिरोजशहा रफाई (वय २६ वर्षे) फरहदशहाचा मेहुणा प्रिंसकुमार रामनगिना सिंग (वय २४ वर्षे), प्रियसी शाहीन शाबम मेहतर (वय २७ वर्ष), बहिण फरहीन प्रिंसकुमार सिंग (वय २० वर्ष) व पत्नी नाझिया फरहद रफाई (वय २५ वर्ष) यांच्या मुसक्या आवळून अपहृत बालकाची सुटका केली.
सदरची कामगिरी ठाणे शहर पोलीस आयुक्त जय जीत सिंग, ठाणे शहर पोलीस सह आयुक्त दत्तात्रय कराळे, प्रशासन विभागाचे अपर पोलीस आयुक्त संजय जाधव, गुन्हे अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पूर्व प्रादेशिक विभाग कल्याण अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण परिमंडळ ३ पोलीस उप आयुक्त सचिन गुंजाळ, डोबिवली विभाग सहाय्यक पोलीस आयुक्त सुनिल कुराडे, कल्याण विभाग सहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने-पाटील,पालघर पोलीस उप अधिक्षक श्री. परदेशी, मानपाडा पो.स्टे.वपोनि शेखर बागडे,श्री अशोक होनमाने, वपोनि महात्मा फुले पो.स्टे. मधुकर कड, वपोनि मध्यवर्ती पो.स्टे., पो.निरि ( गुन्हे ) बाळासाहेब पवार, पोनि (प्रशा) सुरेश मदने, मानपाडा पो.स्टे. पोनि. मोहन खंडारे, विष्णुनगर पो.स्टे., पोनि राजेंद्र अहिरे, बाजारपेठ पो.स्टे., पोनि प्रदिप पाटील, महात्मा फुले पो.स्टे., सपोनि, अविनाश वनवे, श्रीकृष्ण गोरे, सुनिल तारमळे, अनिल भिसे, पोहवाखिल्लारे, पोहवा कोळी, पोहवा गडगे, पोहवा माळी, पोहवा तांबे, पोहवा टिकेकर, पोहवा कदम, पोहवा भोईर, पोहवा काळे, पोहवा हांडे, पोहवा पाटील, पोहवा कसबे, पोना पाटील, पोना पवार, पोना किनरे, पोना भोसले, पोना वायकर, पोना यादव, पोशि ढाकणे, पोशि सोनावणे, पोशि मंझा, पोशि काकड, पोशि चौधरी, नेम- मानपाडा पो. स्टे, सपोनि – दिनेश सोनावणे, पोहवा पिंजारी, नेम- पोलीस उपायुक्त परि ३, कार्यालय कल्याण, कार्यालय, सपोनि योगेश सानप, सपोनि भराटे, पोहवा वानखेडे, पोहवा निवळे, पोशि पोटे, नेम- रामनगर पो.स्टे., सपोनि सरोदे, सपोनि ढोले, पोहवा चौधरी, पोहवा निकाळे, पोना मधाले, पोना टिकेकर, नेम- महात्मा फुले पो.स्टे., सपोनि पगारे, सपोनि बोचरे, सपोउपनिरी अख्तार, पोहवा साळुंखे, पोहवा कदम, पोहवा बोरसे, पोना दळवी, पोशि गावित, नेम- कोळशेवाडी पो.स्टे. सपोनि मुंढे, पोहवा पवार, पोशि चव्हाण, नेम- बाजारपेठ पो.स्टे, सपोनि नितिन आंधळे, पोहवा पवार, पोहवा लोखंडे, पोहवा पवार, पोना पाटील, पोशि शिंदे, पोशि गरुड, पोशि वारगडे, नेम खडकपाडा पो. स्टे. पोउनिरी रजपुत, पोहवा मिसाळ, पोहवा पथके, पोशि डमाळे, पोशि राठोड, पोशि गायकवाड, पोशि शेकडे, पोशि सानप, पोशि वीर नेमणुक विठ्ठलवाडी पो.स्टे. पोहवा दिवटे, पोहवा नागरे, पोहवा कोकोडे नेमविष्णुनगर पो.स्टे. पोहवा नेवले नेम-टिळकनगर यांचे पथकाने केली आहे.
Be First to Comment