Press "Enter" to skip to content

डिस्ट्रिक्ट अध्यक्ष मुक्ती पानसे यांची इनरव्हील क्लब ऑफ कर्जतला भेट

सिटी बेल ∆ कर्जत ∆ संजय गायकवाड ∆

डिस्ट्रिक्ट 313 च्या अध्यक्षा मुक्ती पानसे यांची इनरव्हील क्लब ऑफ कर्जतला भेट दिली.

रॉयल गार्डनच्या सहभागृहात इनरव्हील क्लब ची सर्वसाधारण सभा संपन्न झाली, मुक्ती पानसे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून सभेला सुरुवात करण्यात आली. अध्यक्ष उत्तरा वैद्य यांनी मुक्ती पानसे यांचे स्वागत केले.मुक्ती पानसे यांनी क्रमाक्रमाने सर्व पदाधिकाऱ्यांची टेक्नॉलॉजी वापरून तयार केलेले रेकॉर्ड पाहून कौतुक केले. तसेच एकाच व्यक्तीवर संपूर्ण कार्याचा भार न राहता सर्वांनी एकजुटीने मिळून कसे काम करावे याबाबत ही मार्गदर्शन केले. संपादक ज्योत्स्ना शिंदे यांनी तयार केलेले स्पंदन ई- बुलेटीन प्रकाशित केले व सर्व सदस्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी क्लबचे सर्व पदाधिकारी अध्यक्ष उत्तरा वैद्य, सेक्रेटरी मोनिका बडेकर, खजिनदार अवंतिका गायकर, व्हाईस प्रेसिडेंट वनिता सोनी, ज्योत्स्ना शिंदे, प्राची चौडिये, करुणा पराडकर, शिल्पा दगडे, सदस्या तन्वी जोशी, सरस्वती चौधरी, संजीवनी घुमरे, उज्वला पाटील शीला गुप्ता, सुलोचना गायकवाड, शितल पाटील,मधुरा मुळे, सुप्रिया गिरी, साक्षी अडसुळे, आरती भोईर उपस्थित होत्या.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.