Press "Enter" to skip to content

जय मातादी ग्रुप दिघोडे आयोजित गडकिल्ले व रांगोळी स्पर्धेचे पारितोषिक वितरण

सिटी बेल ∆ उरण ∆ सुनिल ठाकूर ∆

नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे दिघोडे येथील जयमातादी ग्रुप तर्फे दरवर्षी दिवाळीत गडकिल्ले आणि रांगोळी स्पर्धे चे आयोजन करण्यात येते. यावर्षी सुद्धा दिघोडे गावात गड किल्ले व रांगोळी स्पर्धेचे भव्य असे आयोजन करण्यात आले होते.

सदर स्पर्धेतील गडकिल्ले प्रथम क्रमांक प्रथमेश घरत (किल्ले रायगड ), द्वितीय क्रमांक संचित शिवदास म्हात्रे, (प्रताप गड ) तृतीय रणजित ठाकूर (तोरणा किल्ला ), रांगोळी स्पर्धा प्रथम क्रमांक शुभम आत्माराम कोळी, द्वितीय क्रमांक समिधा सुधाकर घरत, तृतीय क्रमांक चेतन बाळाराम पाटील तर अक्षता कोळी, प्रसिद्धी गावंड, कामिनी गायकवाड यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.

स्पर्धेचे परीक्षणाचे शरद कोळी, अभिषेक ठाकूर यांनी काम पाहिले. पारितोषिक वितरण प्रसंगी सरपंच सौ.सोनिया मयूर घरत, जयमातादी चे मयूर घरत, निलेश पाटील, अश्विन पाटील, विनय म्हात्रे आदी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.