Press "Enter" to skip to content

पेण खारेपाटात दररोज पाणीपुरवठा करावा सह्याद्री प्रतिष्ठानचे निवेदन

दोन दिवसाआड होणारा पाणीपुरवठा नागरीकांवर अन्यायकारक — समिर म्हात्रे

सिटी बेल ∆ पेण ∆ वार्ताहर ∆

पेण तालुक्यातील खारेपाट विभागाला शाहपाडा धरणातून होणारा पाणीपुरवठा दोन दिवसाआड होणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाने जाहीर केले असल्याने येथील नागरीकांवर अन्यायकारक आहे. त्यामुळे सदर आदेश मागे घेऊन खारेपाटातील जनतेला दररोज पाणीपुरवठा करावा असे निवेदन सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र उपाध्यक्ष समीर म्हात्रे व युवा सेना समन्वयक विनोद म्हात्रे यांनी पेण ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला दिले आहे.

एकीकडे गेले अनेक वर्ष पेण तालुक्यातील खारेपाट विभाग पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहे.येथे काही अंशी दररोज तर एक दिवस आड होणारा पाणीपुरवठा आता बंद करून पाणीपुरवठा विभागाने मागच्या आठ दिवसांपूर्वी सदर विभागाला दोन दिवसाआड पाणीपुरवठा होणार असल्याचे जाहीर केल्याने येथील नागरिकांनी पाण्याविना कसे जगायचे हाच प्रश्न सतावत असल्याने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी पाण्याच्या झळा सोसाव्या लागणार आहेत.त्यामुळे या खारेपाट विभागातील जवळपास ४२ गावांना याचा फटका बसणार मात्र पाणीपुरवठा विभाग खारेपाटाला एप्रिल आणि मे या दोन महिन्यात मुबलक पाणीपुरवठा करीत असेल तर त्यांनी लेखी पत्र आम्हाला देण्यात यावे अन्यथा संबंधित विभागाने काढलेला आदेश तात्काळ रद्द करावा अशी निवेदनाद्वारे मागणी करून येत्या सात दिवसात पाणीपुरवठा विभागाने सदर आदेश रद्द केले नाही तर खारेपाटातील जनता पाणीपुरवठा कार्यालयासमोर जलाभिषेक आंदोलन करणार असल्याचे समीर म्हात्रे व विनोद म्हात्रे यांनी सांगितले आहे.

पेण शहापाडा धरणामध्ये पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध झाले आहे. हे पाणी खारेपटासह संबंधित गावांना काही महिन्यांसाठी योग्य पध्दतीने उपलब्ध व्हावे याकरिता दोन दिवसाआड असा पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र संबंधित आलेल्या निवेदनाची दखल घेत येत्या चार पाच दिवसात प्रांताधिकारी यांच्या दालनात बैठकीचे आयोजन करण्यात येऊन त्याठिकाणी याबाबत योग्य मार्ग काढला जाईल
– प्रल्हाद बिराजदार – उपअभियंता ग्रामीण पाणीपुरवठा विभाग पेण

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.