Press "Enter" to skip to content

उरण तालुक्यात भाजपला मोठे खिंडार

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत भाजपा चे जिल्हा सरचिटणीस दीपक भोईर यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश

सिटी बेल ∆ उरण ∆ विठ्ठल ममताबादे ∆

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत व सचिव खासदार अनिल देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत उरण विधानसभा मतदारसंघात उरण तालुक्यातील भाजपाचे जिल्हा सरचिटणीस दीपक भोईर यांनी भारतीय जनता पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांसह प्रवेश केला.

शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख बबनदादा पाटील, जिल्हाप्रमुख माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना भवन येथे झालेल्या या पक्ष प्रवेश कार्यक्रमात रजनीकांत तांडेल, सचिन भोईर, निखिल भोईर, भारत ठाकूर, राकेश नारायण भोईर तसेच गोवठणे बीजेपी मधून किरण नथुराम म्हात्रे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला.

यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रायगड उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, उरण तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, पंचायत समिती सदस्य दीपक ठाकूर,उपतालुका संघटक अमित भगत, चिरनेर ग्रामपंचायत सदस्य धनेश ठाकूर, धुतुम ग्रामपंचायत सदस्य रविनाथ ठाकूर, विभागप्रमुख एस के पुरो,उपविभागप्रमुख राजन कडू, कामगार नेते गणेश घरत, मधुकर कोळी, दिनेश घरत, पंकज सुतार, युवासेनेचे भार्गव सामंत, निशांत घरत, ओम पाटील, ग्राहक संरक्षण कक्षाचे अजय सुतार, संदिप जाधव, शाखाप्रमुख शैलेश भोईर, कमलाकर तांबोळी, गणेश तांबोळी, कमलाकर ठोकळ, उरण तालुक्यातील सर्व आजी-माजी पदाधिकारी, युवासेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.