सिटी बेल ∆ रसायनी ∆ राकेश खराडे ∆
रसायनी बजरंग दलाच्यावतीने रसायनी पाताळगंगा परीसरातील मोहोपाडावाडी, शिंदीवाडी, शिवनगर वाडी,पेरुची वाडी चावणे,वडगाव ठाकूरवाडी आदी आदीवासी वाड्यांतील आदीवासी कुटूंबांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले.

यावेळी जवळपास 450 फराळाचे पॅकेट बजरंग दलाकडून देण्यात आले. वाटपप्रसंगी आदीवासी बांधवांच्या चेह-यावर समाधानाचे वातावरण दिसून आले.रसायनीतील बजरंग दलाकडून नेहमीच विविध समाजोपयोगी उपक्रम सुरू असतात.चावणे दुर्गम भागातील आदिवासीबांधवाची हलाखीची परिस्थिती असल्याने दिपावली सणापासून दूर असतात.घरात कोणीही दिवाळी फराळ बनवत नसल्याने त्यांच्या लहान मुलांबाळांना दिवाळीचा फराळ मिळावा म्हणून बजरंग दलाने दिवाळी फराळ वाटप केल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.








Be First to Comment