सिटी बेल ∆ रसायनी ∆ राकेश खराडे ∆
चला छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास आठवूया या उक्तीप्रमाणे रायगड जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष निखिल नरेंद्र डवळे यांच्या माध्यमातून तसेच वासांबे जि.प.रा.काँग्रेस युवक उपाध्यक्ष रोशन म्हात्रे व पोलीस संघटना रा.जि.अध्यक्ष सागर कुरंगळे याचा साथीने रसायनीतील ग्रुप ग्राम पंचायत चांभार्ली हद्दीतील लहान मुलांसाठी व नागरिकांसाठी किल्ले बनवण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. जेणेकरून आपल्या तरुण पिढीला छत्रपतींचा इतिहास माहिती व्हावा तसेच महाराजांचे विचार घेऊन तरुणांनी प्रेरित व्हावे या चांगल्या संकल्पनेतून निखिल डवळे यांनी पुढाकार घेतला व सर्व स्पर्धकांनी सुद्धा स्पर्धेला चांगली दाद दिली.
यावेळी प्रत्येक स्पर्धकाला प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह बक्षीस म्हणून देण्यात आले , एकूण ४६ जणांनी नाव नोंदणी करून अप्रतिम किल्ले बनवले होते.
स्पर्धेमध्ये मोरया मित्र मंडळ कांबे यांनी सिंधुदुर्ग या किल्याची प्रतिकृती तयार करून प्रथम पारितोषिक रुपये ३,३३३/- व भव्य चषक, चांभार्ली येथील अयान मुंढे यांनी मुरुड जंजिरा किल्याची प्रतिकृती तयार करून द्वितीय पारितोषिक रुपये २,२२२/- व भव्य चषक,कांबे येथील अथर्व म्हात्रे यांनी मुरुड जंजिरा किल्याची प्रतिकृती तयार करून तृतीय पारितोषिक रुपये १,१११/- व भव्य चषक, चांभार्ली येथील सर्वेश जांभळे यांनी सिंधुदुर्ग किल्याची प्रतिकृती तयार करून तृतीय पारितोषिक रुपये १,१११/- व चषक व ६ सहभागी किल्ले प्रेमींना उत्तेजनार्थ रूपये ५००/- पारितोषिक देण्यात आले.
यावेळी उरण विधानसभा युवक सरचिटणीस संदेश डवळे ,युवक काँग्रेस वासंबे अध्यक्ष अंकित जांभळे ,साजन शिंदे,नितेश डवळे,युवक काँग्रेसचे भूषण म्हात्रे,योगेश म्हात्रे ,चैतन्य म्हात्रे, राज म्हात्रे,उन्मेश म्हात्रे,विनीत डवळे ,साहील म्हात्रे, विराज म्हात्रे, कौशल म्हात्रे, निहार म्हत्रे,कल्पेश म्हात्रे,जितेश डवले,रोशन गोंधळी ,सचिन गोंधळी, मयूर ,सुशिल इत्यादी युवक उपस्थित होते.








Be First to Comment