निगडोली मार्गी चौक येथे जाणाऱ्या रस्त्याची मोरी खचल्यामुळे रस्त्याच्या मध्यभागी खड्डा
सिटी बेल ∆ काशिनाथ जाधव ∆ पाताळगंगा ∆
निगडोली मार्गी चौक येथे जाणाऱ्या रस्त्याची मोरी खचल्यामुळे मध्यभागी मोठा खड्डा पडल्यामुळे अपघातांची समस्या गंभीर बनत चालली आहे.ह्या पडलेला खड्डा अतिषय धोकादायक असून निगडोली येथे पडलेला असून या लगत एक फार्म हाउस असल्यांचे समजते.
या ठिकाणाहून पातळगंगा नदि वाहत असल्यामुळे तसेच या मार्गावरुन धारणी असरे, जांभिवली, चौक असे अनेक गावे जोडले असतांना असतांना गेले अनेक महिने हा खड्डा पडलेला असून याकडे साफ दुर्लक्ष करण्यात येत आहे.

यामुळे या ठिकाणी सातत्याने अपघात घडत असल्यांचे निदर्शनास येत आहे.हा रस्ता ग्रामीण भागातील गावांना जोडलेला असून या रस्त्याच्या दुरावस्थे बरोबर पडलेला खड्डा अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.या ठिकाणी गॅस पाईप लाईन सुद्धा गेले असल्यांचे समजते.मात्र गेले अनेक महिने सबंधित अधिकारी यांचे निदर्शनास येत नसल्यामुळे या कडे साफ दुर्लक्ष केले जात आहे.रात्रीच्या वेळेस अनेक कामगार वर्ग या मार्गावरून प्रवास करीत असतांत.मात्र या खड्डा निदर्शनास न आल्यामुळे छोटे मोठे अपघात घडत असल्यांचे निदर्शनास येत आहे.
सदर हा खड्डा संबंधित खात्यांने भरुन येथिल प्रवास करीत असलेल्या नागरिकांना दिलासा द्यावा असे मत या ठिकाणी प्रवास करणारे नागरिक व्यक्त करीत आहे.
निगडोली येथे चौक जाणाऱ्या रस्त्यावरील मोरी खचल्यामुळे या ठिकाणी मोठा खड्डा पडल्यामुळे अनेक छोटे – मोठे अपघात घडत असल्यांचे निदर्शनास येत आहे.मात्र सबंधित अधिकारी यांचे साफ दुर्लक्ष होत असल्यांचे पहावयास मिळत आहे. सदर या ठिकाणी पडलेला खड्डा भरुन येथिल प्रवासी वर्गांना दिलासा मिळावा – सुरेश रमण ठोंबरे, निगडोली ,पोलीस पाटील








Be First to Comment