Press "Enter" to skip to content

पेण येथील श्रावणी म्हात्रे हिला किक बॉक्सिंग सुवर्णपदक

सिटी बेल ∆ पेण ∆ वार्ताहर ∆

को.ए.सो. लिटील एन्जेस स्कूल मध्ये इयत्ता दहावीत शिक्षण घेत असणारी पेण तालुक्यातील जिते येथील विद्यार्थींनी श्रावणी दिलीप म्हात्रे हिने किक बॉक्सिंग मध्ये गोल्ड मेडल मिळविले आहे.

वाको इंडिया किक बॉक्सिंग फेडरेशन स्वामी मानसिंग स्टेडियम जयपूर येथे झालेल्या स्पर्धेत राज्यातील अनेक भागातून विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.यात लहानपणापासून खेळण्याची आवड असणाऱ्या श्रावणी म्हात्रे हिनेही सहभाग घेतला असता झालेल्या किक बॉक्सिंग मध्ये तीला हिला गोल्ड मेडल मिळाला.

या तिच्या कौतुकामुळे पेण तालुक्यासह गावातील असंख्य नागरिकांना अतिशय आनंद झाला आहे.यावेळी कोएसो लिटिल एन्जेल स्कूल कमिटीचे सदस्य कृष्णा वर्तक, विश्वास पाटील, राजन पाटील, रविंद्र क्षिरसागर आदिंनी तीला शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, देऊन तिचा सन्मान केला.या खेळात श्रावणीने गोल्ड मेडल मिळवून मोठी कामगिरी केली आहे. येणाऱ्या काळात फ्रान्स येथे आंतरराष्ट्रीय नॅशनल स्पर्धेसाठी श्रावणीची निवड झाली असल्याने त्यातही ती यश संपादन करेल असे कृष्णा वर्तक यांनी यावेळी सांगून तीला पुढच्या यशासाठी सर्वांनी शुभेच्छा दिल्या.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.