Press "Enter" to skip to content

121 रक्तदात्यांनी केले रक्तदान

ईद-ए-मिलादच्या निमित्ताने मुस्लिम समाजाच्यावतीने रक्तदान

सिटी बेल ∆ कर्जत ∆ संजय गायकवाड ∆

ईद-ए-मिलाद च्या निमित्ताने मुस्लिम समाज कर्जत तर्फे भव्य रक्तदान शिबिर चे आयोजन करण्यात आले होते, यावेळी 121 रक्तदात्यांनी केले रक्तदान करून आपला ईद सण साजरा केला व सामाजिक बांधिलकी जपली आहे.
             

जामा मस्जिद कर्जत येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, मुस्लिम समाज अध्यक्ष सैदु शेख यांनी उपस्थितांचे स्वागत केले,सय्यद मुश्ताक़ ईद्रूस यांनी सर्व प्रथम रक्तदान करून शिबिराचा शुभारंभ केला.रक्त संकलनाचे काम संकलन समर्पण रक्तपेढ़ी घाटकोपर चे डॉ.आखलाक शेख व त्यांची टीम यांनी केले त्यांना सार्वजनिक रक्तदाते राजाभाऊ कोठारी यांनी सहकार्य केले.
        

मुस्लीम समाजाचे सलीम मुजावर, नदीम खान, निसार शेख, अब्बास शेख, रशिद मुजावर, इस्माइल दीवान, नदीम कुरेशी, नवाज़ तांबोळी, हामिद खैराट, रमीज़ बिद्री, ज़हूर शेख़, इम्रान अनवर,अज़ीज़ शेख़, एजाज़ मुल्ला, सरताज खान, वहाब मुजावर, हैदर शेख, यूसुफ खान आदी उपस्थित होते. तसेच वेणगाव येथील श्री महालक्ष्मी देवस्थान अध्यक्ष रंजन दातार, भाजपचे सुनील गोगटे, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, सुनील सोनी, शिवसेनेचे नितिन सावंत,बाबू घारे,प्रभाकर करंजकर, जयवंत म्हसे, विनोद पांडे, प्रशांत उगले, अभिषेक सुर्वे, दिनेश कडू, कृष्णा जाधव, महेंद्र कांबळे,  सुरेश सुर्वे, चेतन शाह, मोहन ओसवाल, इल्यास कर्जतवाला, रौनक कोठारी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.