Press "Enter" to skip to content

कल्याणी जाधव हिच्या रांगोळीचे कौतुक

दसरा निमित्ताने घरोघरी रांगोळी,आणी फुलांच्या तोरणांनी सजले

सिटी बेल ∆ काशिनाथ जाधव ∆
पाताळगंगा ∆

सरा असल्यामुळे सकाळ पासून घराघरा मध्ये आनंदाचे व मांगल्याचे वातावरण निर्माण झाले होते.बाजार पेठेत मोठ्याप्रमाणावर फुले विक्रीला आल्यामुळे घरोघरी फुलांचे तोरण दारावरील लावलेले पहावयास मिळत होते.त्याच प्रमाणे प्रत्येकांच्या अंगणात विविध प्रकारची रांगोळी काढलेली पहावयास मिळाली.विशेष करुन सायंकाळी आपट्यांची पाने म्हणून सोनं एकमेकांच्या घरी जावून देण्यांची परंपरा असल्यामुळे त्यांच प्रतिक म्हणून कल्याणी जाधव हिने आपट्यांच्या पानांची रांगोळी तसेच या दिवशी रामाने रावनांचा वध धनुष्य बाणांनी केला त्याच प्रतिक म्हणून या दोन्ही बाबी या रांगोळी मध्ये समाविष्ट केले आहेत.अतिषय मोहक त्या रांगोळीचे चित्र काढल्यामुळे अनेकांनी आपल्या मोबाईल मध्ये कैद केले.

महिला वर्गांना विशेष करुन रांगोळी काढण्यांची कळा आणी आवड असल्यामुळे अंगणामध्ये विविध प्रकारच्या रांगोळी पाहावयास मिळाली कल्याणी जाधव ही कॉलेज मध्ये शिक्षण घेत असतांना चित्रकला हा तिचा आवडता विषय असून तिने अनेक महापुरुष तसेच नैसर्गिक सौंदर्याचे चित्र काढलेले आहेत.तसेच विविध चित्रकला स्पर्धेत भाग घेवून तिने प्रथम क्रमांक पटकविला आहे.नुकताच तिने भारत की आजदि अमृतमोहत्सव मध्ये भाग घेवून आपली रांगोळी कला सादर करुन अनेकांचे मन जिंकले असल्यामुळे तीच्या या कलेला कौतुकांची थाप पडत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.