Press "Enter" to skip to content

पालिकेच्या नोटीसीला केराची टोपली

पेण शहरातील रिंग रोडवर अनाधिकृतपणे दुकानांचे गाळे : पालिका आणि गाळेधारक यांचे आर्थिक साटेलोटे ?

सिटी बेल ∆ पेण ∆ वार्ताहर ∆

मागील काही दिवसांपासून पेण नगरपालिका हद्दीत अनाधिकृतपणे बांधकामांना ऊत आला आहे. शहरातील कडू मार्गावरील (पाम बीच) रिंग रोड रस्त्यावर असंख्य गाळे आणि पत्र्याच्या शेड अनाधिकृतपणे उभारण्यात आल्या आहेत.मात्र याकडे नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत असून यात पालिका अधिकाऱ्यांचे काही साटेलोटे तर नाही ना असेच शहरात बोलले जात आहे.

शहरातली रिंगरोड लगत वनगे या व्यक्तीची जागा असून या जागेवर आरक्षण असल्याने येथे नियमानुसार कोणत्याही प्रकारचे व्यावसायिक बांधकाम अथवा पत्र्याची शेड, गाळे बांधण्यास परवानगी नाही माञ तरीही वनगे यांच्या जागेमध्ये असंख्य पत्र्याच्या शेंडे गाळे पालिकेची परवानगी नसतानाही उभारले असून विविध व्यावसायिकांना सदरचे गाळे भाडेतत्त्वावर दिले आहेत.व यातून लाखो रुपये कमवित आहेत.याबाबत पालिकेच्या नियमाचे उल्लंघन केले आहे. ही बाब उघडकीस आल्यानंतर पेण नगरपालिकेने वनगे यांना २६ एप्रिल २०२२ रोजी नियमांचे उल्लंघन केल्याबाबत नोटीस पाठवून नोटीस मिळाल्यापासून एक दिवसाच्या आत अनधिकृतपणे असणारे गाळे स्वतःहुन तोडण्यात यावेत अदे आदेश दिले.मात्र पालिकेच्या या आदेशाला केराची टोपली दाखवण्यात आली आहे.

जवळपास पाच महिने होऊन गेली तरी ना मालकानी हे गाळे तोडले की ना पालिकेने कोणत्याच प्रकारची कारवाई केली त्यामुळे या पाच महिन्यांच्या कालावधीत जागाधारक आणि पालिकेचे अधिकारी यांच्यात काहीतरी अर्थीक साटेलोटे झाल्याचे दिसून येत आहे.त्यामुळेच तर काय पालिकेने पाठवलेल्या नोटिसीला संबंधितांनी केराची टोपली दाखवली आहे.

जागा मालकाने अधिनियमानुसार आवश्यक परवानगी न घेता जे काम केले आहे.ते अनाधिकृत आहे. यामध्ये लोखंडी अँगल आणि पत्र्याचे शेड उभारून दुकान गाळे उभे केल्याचे आमच्या निदर्शनास आल्याने आम्ही जागा मालकाला योग्य ती नोटीस पाठवून हे बांधकाम त्वरीत हटविण्यास सांगितले आहे.मात्र तरी देखील जागा मालकाने हे दुकान गाळे हटविले नसल्यास आम्ही स्वतः हे गाळे पाडून टाकू आणि झालेला कारवाईचा खर्च जागा मालकाकडून वसूल करणार आहोत.
जीवन पाटील – मुख्याधिकारी पेण नगर परिषद

शहरातील रिंग रोड लगत असणारी जागा माझी बिनशेती जागा आहे.त्यावर आरक्षण आहे.मात्र मी बांधकाम केलेला नाही नुसते पत्र्याचे शेड उभारून गाळे केले आहेत.माझ्या असलेल्या जागेत पत्र्याचे गाळे उभारण्याचे अधिकार जागा मालकाला आहेत त्यामुळे माझ्या जागेत हे गाळे उभारले गेले आहेत.
स्वप्निल वनगे – जागा मालक

पेण शहरातील चिंचपाडा सारख्या महत्वाच्या आणि मोक्याच्या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात अनधिकृत गाळे तयार केले जातात आणि पालिकेने नोटीस देऊनही पाच महीने झाले तरी गाळे धारक प्रशासनाला ऐकत नाही हा पालिकेचा चालढकलपणाच वाटत आहे‌.पण तरीही येत्या आठवडा भरात पालिकेने रीतसर कारवाई केली नाही तर पालिकेच्या विरोधात वरिष्ठ स्तरावर पत्रव्यवहार करणार आहे.
हरिष बेकावडे – सामाजिक कार्यकर्ते

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.