उपजिल्हा रुग्णालय पनवेल मधील भिंती स्वच्छता, पंखे, लाद्या, परिसर स्वच्छता
सिटी बेल ∆ पनवेल ∆
डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान,रेवदंडा तर्फे पद्मश्री पुरस्कार सन्मानित डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी आणि डॉ. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक २ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र भूषण डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालय पनवेल येथे सकाळी स्वच्छ्ता अभियान राबविण्यात आले.
यात सकाळी सात वाजता ५०० हून अधिक श्री सदस्यांनी सहभाग नोंदविला. सकाळी ७.३० वाचता अभियानास सुरवात झाली. यावेळी डॉ श्री नानासाहेब प्रतिष्ठान तर्फे साफ सफाई साठी लागणारे सर्व साहित्य पुरविण्यात आले. यावेळी हॉस्पिटल मधील भिंती स्वच्छता, पंखे, लाद्या, परिसर स्च्छता करण्यात आली.
डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान मार्फत अनेक समाजपयोगी उपक्रम राबवले जातात. स्वच्छ्ता अभियान, वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धन, रक्त दान शिबिर, जल पुनर्भरण, प्रौढ साक्षरता अभियान राबविण्यात येतात.










Be First to Comment