सिटी बेल ∆ पनवेल ∆
साकव्य या लावणी कलेच्या वृद्धी साठी वाहून घेतलेल्या समूहा तर्फे आयोजित लावणी लेखन स्पर्धेत रोहा पेण च्या श्रीनिवास गडकरी यांच्या लावणीला “उत्कृठ ” पुरस्कार मिळाला आहे.
तीनशे स्पर्धक सहभागी असलेल्या या स्पर्धेत उत्तेजनार्थ, तृतीय, द्वितीय,, व प्रथम पुरस्कारा नंतर ” उत्कृष्ठ ” हा पुरस्कार देण्यात आला. श्रीनिवास गडकरी यांच्या बरोबरच बदलापूर चे यशवंत पगारे व साताऱ्याच्या संगीता माने यांच्या लावणीला हा पुरस्कार विभागून देण्यात आला. ” तमाशातील नायिका गायकाच्या प्रेमात पडते ” असा विषय स्पर्धे साठी देण्यात आला होता.
समूह संचालिका प्रिया इंगळे, अध्यक्ष पांडुरंग कुळकर्णी यांनी यशस्वी लावणीकारंचे अभिनंदन केले. हरिश्चंद्र धिवर यांनी परीक्षक म्हणून काम पहिले.








Be First to Comment