Press "Enter" to skip to content

नागोठणे ग्रामपंचायत कार्यालयात क्षमता बांधणी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

सिटी बेल ∆ याकुब सय्यद ∆ नागोठणे ∆

नागोठणे शहर व विभागातील स्वयंसहायता महिला बचत गटांना शासनाच्या असलेल्या योजनाची माहिती देण्यासाठी व मार्गदर्शन करण्यासाठी रोहा पंचायत समितीचे प्रभारी सहाय्यक गट विकास अधिकारी महारुद्र फडतरे व कुंभारे कृषी अधिकारी पंचायत समिती रोहा हे उपस्थित होते.

या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली प्रास्ताविक व स्वागत नागोठणे ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी मोहन दिवेकर यांनी केले.

रायगड जिल्हा परिषद अलिबाग व पंचायत समिती रोहा यांच्या वतीने राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत आमचे गाव आमचा विकास उपक्रमांतर्गत सन 2023 ते 2024 च्या वार्षिक विकास आराखडा तयार करणे संदर्भात पंचायत समिती गणाचे एक दिवसीय क्षमता बांधणी व प्रशिक्षण कार्यशाळा नागोठणे ग्रामपंचायत कार्यालयात असलेले हॉलमध्ये दिनांक29/09/2022/रोजी सकाळी ठिक 11: वाजता घेण्यात आले.

1) गरिबीमुक्त आणि उपजीविका पोषक गाव 2) आरोग्यदायी गाव 3) बालसनी गाव 4) जलसमुद्री गाव 5) स्वच्छ हरी गाव 6) स्वयम पायाभूत सुविधा युक्त गाव 7) सामाजिक दृष्ट्या सुरक्षित गाव 8) लिंग समभाव पोषक गांव 9) सुशासन युक्त गाव शासनाच्या या सर्व योजनांची पूर्णपणे माहिती नागोठणे शहर व विभागातील स्वयंसहायता महिला बचत गटांचे अध्यक्ष सचिव त्याचबरोबर सदस्यांना देण्यात आली.

या कार्यक्रमाला नागोठणे ग्रामपंचायतचे सरपंच डॉक्टर मिलिंद धात्रक विद्यमान सदस्य मोहन नागोठणेकर ज्ञानेश्वर साळुंखे ग्राम विकास अधिकारी मोहन दिवेकर शाळेचे केंद्रप्रमुख मुदब्रुध अंगणवाडी ताई त्याचबरोबर स्वयंसहाय्यता महिला बचत गटाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव व सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.