Press "Enter" to skip to content

इनरव्हील क्लबच्या स्पर्धेत प्राची चौडीए यांचे उज्वल यश

सिटी बेल ∆ कर्जत ∆ संजय गायकवाड ∆

इनरव्हील क्लब ऑफ डिस्ट्रिक्ट-313 ची 38 वी डिस्ट्रिक्ट आय एस ओ व एडिटर मीट- 2022 या स्पर्धा नुकत्याच घेण्यात आल्या, या स्पर्धेत इनरव्हील क्लब कर्जतच्या आयएसओ प्राची चौडिए यांनी उज्वल यश संपादित केले आहे.

यश संपादन केलेल्या क्लबच्या प्राची चौडीए आणि ज्योत्स्ना शिंदे

रिव्हर साईड यांनी पुणे बाणेर येथे माऊली गार्डन येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, ब्राइड्स ऑफ इंडिया, नृत्य नाटिका, सुरीली आय एस ओ.. अशा तीन स्पर्धा होत्या, नृत्य नाटिका, सुरीली यामध्ये कर्जत क्लबच्या आयएसओ प्राची चौडीए यांनी ब्राइड्स ऑफ इंडिया या स्पर्धेत भाग घेऊन दुसरे पारितोषिक मिळवले त्यांनी बंगाली ब्राईड हा वेश परिधान केला होता. इंद्राणी म्हणजे एडिटर साठी वंडर लेडीज आणि क्रिएटिव्ह ड्रेस या दोन स्पर्धा त्यात कर्जत क्लबच्या एडिटर ज्योत्स्ना शिंदे यांनी वंडर लेडीज मध्ये भाग घेऊन मॉरिशसच्या पहिल्या महिला अध्यक्ष झाल्या होत्या, सर्व स्पर्धाना उत्तम प्रतिसाद मिळाला डिस्ट्रिक्ट चेअरमन मुक्ती पानसे व अन्य पदाधिकारी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमास कर्जत क्लबच्या अध्यक्ष उत्तरा वैद्य, खजिनदार अवंतिका गायकर, शीला गुप्ता, ॲड.संजीवनी घुमरे, रूपा खणाल उपस्थित होत्या.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.