Press "Enter" to skip to content

धनडांडग्यांच्या ओव्हरलोड वाहतुकीला आशीर्वाद कुणाचा ?

ओव्हरलोड वाहतूक १५ दिवसांत बंद न झाल्यास किशोरभाई म्हात्रे व मनोहरभाई सुटेंचा आंदोलनाचा इशारा

सिटी बेल ∆ नागोठणे ∆ महेश पवार ∆

रायगड जिल्ह्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात ओव्हरलोड वाहतूक सुरु आहे. त्यामुळे घडलेल्या अपघातांत अनेकांना नाहक आपल्या प्राणास मुकावे लागलेले आहे. नागोठणे रोहा मार्गावरील भिसे खिंडितही कोळसावाहू ट्रकने ठोकरल्याने एक वृध्द व्यक्तीचा ट्रकखाली गाडल्याने नुकताच नाहक बळी गेला होता.
ही ओव्हरलोड वाहतूक बहुतांशी धनडांडग्याचीच होत असून या वाहतुकीला नक्की कुणाचा आशीर्वाद आहे असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते किशोरभाई म्हात्रे यांनी पेण येथील उपविभागीय परिवहन अधिकारी महेश देवकाते यांना त्यांच्या कार्यालयात विचारला. तसेच या ओव्हर लोड वहातुकीमध्ये वापरण्यात येणारी वाहने कुणाचीही असो कारवाई ही व्हायलाच पाहिजे याचबरोबर या ओव्हरलोड वाहतूकीवर येत्या १५ दिवसांत कारवाई न केल्यास तीव्र आंदोलनाची दिशा ठरविण्यात येईल असा गंभीर इशारा किशोरभाई म्हात्रे व ऐनघर ग्रामपंचायतीचे वरिष्ठ सदस्य मनोहरभाई सुटे यांनी परिवहन अधिका-यांना एका निवेदनाद्वारे दिला आहे.

यावेळी किशोरभाई म्हात्रे व मनोहरभाई सुटे यांच्यासह जितेंद्र धामणसे, ओमप्रकाश मोदी, भूपेद्र बामणे, योगेश कदम, निमिष वाघमारे आदी उपस्थित होते.

गेले काही महिने अनेक वेळा पत्र व्यवहार करुनही त्याला केराची टोपली दाखवली जात असे. परंतु आता रस्त्यावर उतरल्याशिवाय गप्प बसणार नाही. रायगड जिल्ह्यात चालत असलेल्या ओव्हरलोड वहातूक करणारी वहाने ही धन दांडग्यांची असल्यामुळे कारवाई केली जात नाही का ? असा प्रश्नही यवेळी किशोरभाई म्हात्रे यांनी आर.टी.ओ. महेश देवकाते यांना विचारला. रेवदंडा इस्पात येथून वडखळ येथे पक्या लोखंडाची गोटी रोहा मार्गे ,नागोठणे बाजूने वडखळकडे वहातूक केली जाते. तसेच वडखळ येथून नागोठणे मार्गे, वडखळकडे कच्या लोखडांच्या गोटीची वहातूक केली जात आहे. त्याचप्रमाणे वडखळ जेटीवरुन रोहा, पेण तालुक्यातील औद्योगिक कारखान्यात दिवस-रात्र ओव्हरलोड कोळशाची वहातूक होत आहे.

सानेगाव जेटीवरुन रोहा भिसेखिंड नागोठणे मार्गे सुध्दा ही ओव्हरलोड वहातूक केली जाते.रविवार दि.११ सप्टेंबर रोजी रोहा तालुक्यातील सानेगाव जेटीवरुन ओव्हरलोड कोळशाने भरलेला ट्रक भिसेखिंड नागोठणे पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये वळणावर आल्यावर नागोठणे बाजूकडून जाण्या-या रोहा तालुक्यातील ताडगाव येथील धर्मा शिगवण या ६२ वर्षीय वयोवृद्ध व्यक्तीला आपला नाहक जीव गमवावा लागला होता. त्यांच्या मोटारसायकलला याच ओव्हरलोड कोळशाच्या ट्रकने चुकीच्या बाजूने मोटारसायकलस्वाराच्या अंगावर येऊन जोराची धडक दिली. त्यामुळे दिवंगत शिगवण यांच्या शरीरासह ५० मिटर खोलवर ट्रक दरीत जाऊन ड्रायव्हरच्या बाजूकडे पलटी झाल्याने शिगवण ट्रकखाली गाडले गेले होते.

ओव्हरलोड वहातूकीमुळे यापूर्वीही अनेक अपघात झालेले असून ओव्हर लोड वहातूकीवर १५ दिवसांमध्ये कारवाई केली नाही तर आम्ही सर्व जनतेला बरोबर घेऊन रस्त्यावर उतरुन जनआंदोलन छेडू असा इशाराही यावेळी किशोरभाई म्हात्रे व मनोहरभाई सुटे यांनी परिवहन अधिका-यांना दिला आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.