Press "Enter" to skip to content

नागोठणे पोलिस ठाणे हद्दीत कच्चा लोखंडी गोळीच्या माल सहीत दोन आरोपी अटक

सिटी बेल ∆ नागोठणे ∆ याकुब सय्यद ∆

नागोठणे पोलिस ठाणे हद्दीत रद्दवालगत असलेला पुलाजवळ हाॅटेल जयभवानी समोर मोकळे जागेत कच्चा लोखंडी गोळीचा माल सफेद गोणी मध्ये भरलेले प्रति किलो 35 रुपये दराचे लोखंडी गोळीचा माल असल्याची खात्रशीर माहिती गुन्हे अन्वेषण विभाग अलिबाग यांना मिळताच फिर्यादी सुनील ज्ञानदेव खराटे गुन्हे अन्वेषण विभाग अलिबाग रायगड महाराष्ट्र यांनी घटनास्थळी कच्चा लोखंडी गोळी मालावर छापा मारला हा लोखंडी गोळीचा माल जवळ जवळ सातशे पन्नास किलोग्रॅम वजनाचे असून त्याची अंदाजे किंमत 19950 ऐवढ्या रक्कमचे तपासात आढळून आले आहे

त्याच बरोबर कच्चा गोळीचा माल घेऊन जाणारे दोन आरोपी मैसर अली सय्यद अल्ली फारुख वय 47 राहणार एव्हर ग्रीन हाऊसिंग सोसायटी मोतीलाल नेहरूनगर बीकेसी बांद्रा मुंबई दुसरा आरोपी अश्फाक अहमद अस्लम मुकादम वय 46 राहणार गार्डन नियर तालाब मुंब्रा जिल्हा ठाणे यांना मुद्देमाला सहित दिनांक 17/ 09/ 2022 रोजी ठीक रात्री 1:15 वाजता नागोठणे पोलिसांनी अटक केली आहे.

दिनांक 17/ 09 /2022 रोजी नागोठणे पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 0115/2022 मुंबई पोलीस अधिनियम 1951 इतर 124 प्रमाणे सकाळी 6:43 मिनिटावर दोन आरोपींवर गुन्हा नोंदविण्यात आले आहे पुढील तपास नागोठणे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजन जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार भायदे पुढील तपास करीत आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.