Press "Enter" to skip to content

वेश्यांची दलाली करणाऱ्या दोन महिलांसह ग्राहकाला अटक

सिटी बेल ∆ पनवेल ∆ वार्ताहर ∆

गरजवंत तरुणी व महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेणाऱ्या दोन दलाल महिलांना व वेश्यागमनासाठी आलेल्या व्यक्तीला कामोठे पोलिसांनी सापळा लावून अटक केली.

उपासना मल्ला (३४) व आरती रोकडे (२८) अशी या दोघींची नावे असून, त्या कामोठे सेक्टर १६ मधील एका फ्लॅटमध्ये वेश्याव्यवसाय चालवत होत्या. उपासना हिने हा फ्लॅट भाड्याने घेऊन तेथे ती हा व्यवसाय चालवत होती. याबाबतची माहिती कामोठे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता जाधव यांना मिळाल्यानंतर त्यांनी बनावट ग्राहकाला सदर महिलेच्या फ्लॅटवर कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. वेश्यागमनासाठी पाठवून सापळा रचून ही कारवाई केली. या कारवाईत फ्लॅटमध्ये एक महिला वेश्याव्यवसाय करताना आढळून आली.

या वेळी पोलिसांनी केलेल्या तपासणीत उपासना मल्ला व आरती रोकडे या दोघी वेश्यागमनासाठी महिला व तरुणींना पुरवत असल्याचे तसेच त्या गरजवंत महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेत व ग्राहकांकडून ४ हजार रुपये घेऊन त्यातील दीड हजार रुपये ते या मुलींना देत असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी ग्राहकासह उपासना व आरती यांच्या विरोधात कामोठे पोलीस ठाण्यात पिटा कार्याअंतर्ग गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे .

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.