राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला प्रदेश सरचिटणीस भावनाताई घाणेकर यांच्यावरील हल्ल्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे निषेध
सिटी बेल ∆ पनवेल ∆
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला प्रदेश सरचिटणीस आणि राष्ट्रवादीच्या नेत्या सौ भावनाताई घाणेकर यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला आहे.
सौ भावनाताई घाणेकर यांचा जनमाणसातील वाढता प्रभाव कामाची हातोटी आणि पक्ष नेतृत्वाचा विश्वास यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकू लागल्याने अशा प्रकारचे भाड्या कृत्य समाजकंटकांच्या करवी करण्यात आलेल्या आहे याचा तीव्र शब्दांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अधिकार करीत असून शासकीय यंत्रणाला विनंती करीत आहे की याबाबतीत लवकरात लवकर आपण गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांना खतपाणी घालणाऱ्या आणि गुन्हा करणाऱ्यांना अटक करावी.
– डॉ शिवदास कांबळे, माजी नगरसेवक, कार्यकारी जिल्हाध्यक्ष पनवेल शहर जिल्हा











Be First to Comment