माथेरानचा प्रवासी नाका झाला डीजीटल : पर्यटकांना मिळणार डिजिटल प्रवेश तिकीट
सिटी बेल ∆ कर्जत ∆ संजय गायकवाड ∆
माथेरान नगरपालिकेच्या मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांनी माथेरान नगरपालिकेचा कारभार हाती घेऊन एक वर्ष पूर्ण झाले त्यांनी माथेरानच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार करून अनेक धाडसी निर्णय घेऊन माथेरान चे एक पाऊल विकासाच्या दृष्टीने पुढे टाकत आहेत.
माथेरानचे आर्थिक स्तोत्र असलेले प्रवासी कर नाका काल दि.9 सप्टेंबर अनंत चतुर्थी च्या मुहुर्तावर ङीजीटल करण्यात आला त्यामुळे या पुढे प्रवाशांना ङीजीटल तिकीट मिळणार आहे त्यामुळेपुर्वी पासुन सुरू असलेले पावती पुस्तके इतिहास जमा होणार आहेत या ङीजीटल प्रणाली मुळे कोणत्या दिवशी माथेरान मध्ये किती पर्यटक माथेरान मध्ये आले याची अचूक माहिती ङिसपेले द्वारे नागरिकांना मिळणार आहे.
तिकीटा सोबत एक माथेरान नगरपालिकेची व्हेब साईङ नगरपालिकेने केली असून त्यात नगरपालिकेची माहीती उपलब्ध होणार आहे, आदी अपङेट नियमित मिळणार असून तिकीटा मध्ये दिलेल्या बारकोटच्या माध्यमातून एका क्लिक वर ऑफीशियल सर्व माहीती नागरिकांना मिळू शकेल असे मुख्याधिकारी भणगे यांनी सांगून या करता नाक्यावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना याबाबत चे प्रशिक्षण देण्यात आले आहे.








Be First to Comment