सिटी बेल ∆ काशिनाथ जाधव ∆
पाताळगंगा ∆
खालापुर तालुक्यातील रा.जि.प.शाळा महड येथे मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत असलेल्या उपक्रमशील, तंत्रस्नेही शिक्षिका अनिता रामचंद्र चव्हाण यांना त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल अविष्कार फाउंडेशनच्या रायगड जिल्हा शाखेतर्फे राज्यस्तरीय गुणवंत शिक्षिका पुरस्कार २०२२ जाहीर झाला आहे.
याबाबतची माहिती अविष्कार फाउंडेशनचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष पत्रकार संजय पवार यांनी दिली आहे.या पुरस्काराचे वितरण रविवार दिनांक २५ सप्टेंबर रोजी सकाळी ११: ०० वाजता कुलकर्णी भाई बिरादर हॉल उपजिल्हा रुग्णालयाजवळ तालुका श्रीवर्धन जिल्हा रायगड या ठिकाणी करण्यात येणार आहे.सदर पुरस्कार जाहिर झाल्यांचे समजताच अनिता चव्हाण यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.








Be First to Comment