Press "Enter" to skip to content

पेण चांदेपट्टी येथील घटना

रागाच्या भरात पत्नीच्या डोक्यात सिलेंडर घालून केला खून : पतीला अटक

सिटी बेल ∆ पेण ∆ वार्ताहर ∆

पेण तालुक्याच्या पुर्व विभागातील चांदेपट्टी येथे किरकोळ कौटुंबिक वादातून पतीने पत्नीच्या डोक्यात सिलेंडर घालून तीचा निघृणपणे खून केल्याची घटना दि.८ रोजी सायंकाळी घडली आहे.त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

गणपती उत्सवासाठी संजय तुकाराम दळवी व त्याची पत्नी सुवर्णा संजय दळवी (वय ४०) हे पेण तालुक्यातील चांदेपट्टी या गावी आले होते. या दांपत्यामध्ये काही कारणास्तव गुरूवारी सायंकाळी वाद झाला सदर वाद विकोपाला गेला असल्याने रागाच्या भरात पती संजय दळवी याने पत्नी सुवर्णाच्या डोक्यात सिलेंडर टाकुन तिची निघृणपणे हत्या केली त्यातच तिचा जागीच मृत्यू झाला.

सदर दांपत्याला त्यांना दोन मुली, एक मुलगा, आई असा परिवार आहे.या घटनेची माहिती मिळताच अपघातग्रस्तांचे देवदूत कल्पेश ठाकूर आणि गावातील युवक महेश भिकावले हे तात्काळ रुग्णवाहिका घेवून घटना स्थळी पोहचले व सुवर्ण दळवी यांना उपचारार्थ पेण येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

याबाबत पेण पोलिसांनी आरोपी संजय दळवी याला अटक केली आहे.परंतु या दोघांमधील नेमक भांडणाच कारण स्पष्ट झालेले नसून पुढील तपास पोलिस निरीक्षक देवेंद्र पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी तडवी, काळे, फड करीत आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.