Press "Enter" to skip to content

रोहा तहसीलदार, प्रांत, गट विकास अधिकारी यांचा वरदहस्त ?

अंतिम स्थगिती असलेल्या जागेवर अनाधिकृत बेकायदेशीर बांधकाम बिनदिक्कत सुरू

सिटी बेल ∆ रोहा ∆ समीर बामुगडे ∆

ग्रुपग्रामपंचायत वरसे रोहा रायगड मधील सर्व्हे नंबर 4/3, 4/4, 4/5, 16/0, 15/0, 38/3, 42/3, 43/2ब 44/5, 51/2अ, 53/3ब, 57/1,57/2, 67/2, 17/1, 14/0, 17/5, 38/6, 17/2 या सर्व्हे नंबर वर दि. 26/02/2002 रोजी उपविभागीय अधिकारी माणगाव यांनी दि. 26/12/2001 रोजी तहसिलदार रोहा यांच्या आदेशास अंतिम निकाल होईपर्यंत स्थगिती आदेश दिले आहे. उपविभागीय अधिकारी माणगाव यांचा अंतिम स्थगिती आदेश असताना दावा उपविभागीय अधिकारी रोहा यांच्या कोर्टात न्यायप्रविष्ट असताना दाव्याचा निकाल लागला नसताना बेकायदेशीर जमीन विक्री करण्यात आली आहे. सर्व्हे नंबर 38/3, 38/6 मध्ये अनधिकृत बेकायदेशीर इमारती बांधकाम झाले आहे व बांधकाम चालू आहे. भ्रष्ट शासकीय अधिकारी आणि त्यांच्या मागे असलेली राजकिय पॉवर यामुळेच सर्व्हे नंबर 38/3, 38/6 अनधिकृत बेकायदेशीर बांधकाम चालू आहेत.

अंतिम स्थगिती आदेश दावा प्रकरणाची माहिती ग्रुप ग्रामपंचायत वरसे ता. रोहा कार्यालयाला दिलेली असता कार्यालयाने या बाबीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून नियमबाह्य बेकायदेशीररित्या वादग्रस्त जागेस बिनशेती विकास कामे लाइट, नळ कनेक्शन साठी नाहरकत दाखले दिले गेले आहेत.

या प्रकरणी अरुण चंद्रकांत चव्हाण यांनी वरसे ग्रामपंचायती कडे दि. 24/02/2014 रोजी तक्रार अर्ज दाखल केला असता ग्रुप ग्रामपंचायत वरसे ता. रोहा यांनी दि. 22/05/2015 रोजी ठराव घेऊन ठरावामध्ये
1) तहसीलदार तहसील कार्यालय रोहा यांचे दि. 31/04/2014 चे पत्र 2)उपविभागीय अधिकारी माणगाव यांचे दि.26/02/2002 अंतिम स्थगिती आदेश व
3)मा. जिल्हाधिकारी रायगड दि. 3/01/2013 पत्राची नोंद घेऊन जोपर्यंत अंतिम स्थगिती आदेश उठत नाही तोपर्यंत ग्रामपंचायतीकडून लागणारे बिनशेती विकास काम इतर दाखले वरील सर्व्हे नंबरला ग्रामपंचायतीकडून देण्यात येऊ नये असा ठराव पारित केला.

ग्रामपंचायतीने ठराव घेऊन सुद्धा ग्रामपंचायतीकडून नियमबाह्य व बेकायदेशीररित्या अंतिम स्थगिती प्रलंबित दावा प्रकरणातील सर्व्हे नंबर 38/3, 38/4, 38/6, 4/4, 53/3ब, 42/3, 15/0 यांना बिनशेती विकास कामे लाइट, नळ कनेक्शन इत्यादीसाठी नाहरकत दाखले देण्यात आलेले आहेत व दिले जात आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.